त्याचे झाले असे की, करण जोहर याच्या बाप बनल्याच्या ट्विटनंतर त्याच्यावर सबंध बॉलिवूडकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात होता. अशात ऋषी कपूर यांनी ट्विट करताना युजर्सला काही प्रश्न विचारले. त्यातले पहिले ट्विट म्हणजे, ‘माझ्यात आणि आताच वडील झालेल्या करण जोहर यांच्यात काय समानता आहे?’ (दोघांनीही त्यांच्या मुलाचे नाव वडिलांच्या नावावरून ठेवले आहे) तसेच दुसºया ट्विटमध्ये म्हटले की, ‘मला कोणी सांगू शकेल का की, कोणत्या टीव्ही चॅनलवर पाकिस्तान सुपर लीग मॅच सुरू आहे?’ ऋषीच्या या ट्विटनंतर युजर्सनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. दुसºया दिवशी जेव्हा ऋषी कपूर यांनी युजर्सच्या प्रतिक्रिया वाचल्यात तेव्हा त्यांनी बºयाचशा युजर्सला ब्लॉक करण्यास सुरुवात केली. }}}} ">http://}}}} ">Butt sahab aap Pakistan ke honge! Pata naheen wahan ke log mujhe "Rashi" kyon bulate hain. Mera naam "RISHI"hai. Aksar ye galati hoti hai. https://t.co/RhyGHwjeCH— Rishi Kapoor (@chintskap) March 6, 2017
हिंदुस्तान टाइम्सने ऋषीच्या या रिअॅक्शनवर विचारले असता त्यांनी म्हटले की, ‘जर तुम्ही मला शिवी देत असाल तर, तुम्हाला काय वाटतेय की मी शांत राहणार? हे ते लोक आहेत, जे माझ्यासोबत गलिच्छ भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. माझा फायदा उठविण्याचा प्रयत्न करतात. मी त्यांना थेट फटकारू शकतो. ते फालतू लोक आहेत. ते मला फॉलो करतात म्हणूनच तर मी त्यांना थेट मॅसेज पाठवू शकतो. जेव्हा ऋषीला पब्लिकली मॅसेज ऐवजी डायरेक्ट मॅसेजविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की, मी सुरुवातीला स्पष्ट केले की, मी माझ्या टाइमलाइनवर अशाप्रकारच्या मॅसेजेसला ठेवू इच्छित नाही. त्यामुळे मी त्यांना मॅसेज करून थेट फटकारतो. शिवाय त्यांना हेही स्पष्ट करतो की, मी कोणालाही माझ्यावर चढू देणार नाही’ }}}} ">http://}}}} ">Depends on the idiots and smart asses! https://t.co/RaZgZUflNn— Rishi Kapoor (@chintskap) March 6, 2017
मात्र ऋषीचा हा मॅसेज फॉर्म्युला आता जाहीरपणे सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच ‘खुल्लमखुल्ला’ आॅटोबायोग्राफीचे प्रकाशन करणाºया ऋषीचे हे अभद्र मॅसेजेस् जाहीरपणे सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. काही युजर्सनी त्यांच्या अभद्र मॅसेजेस् स्क्रीनशॉर्ट काढून त्यांना रिट्वीट केले आहे. एका युजर्सने या मॅसेजेस्चा स्क्रीनशॉर्ट शेअर करताना लिहिले की, सुरुवातीला डायरेक्ट मॅसेजेसच्या माध्यमातून महिलांना शिवीगाळ केली. त्यानंतर पारशी समुदायावर अभद्र भाषेत टीका केली. हे आहेत, बॉलिवूडचे स्टार ऋषी कपूर. कारण त्यांचे बरेचसे असे ट्विट्स आहेत, ज्यामध्ये त्यांनी अभद्र भाषा वापरली आहे.}}}} ">Fuck you dickhead! https://t.co/7FoYxZWbi8— Rishi Kapoor (@chintskap) March 5, 2017