Join us

पद्मिनी कोल्हापुरे यांनी सांगितले, ऋषी कपूर यांनी दोनदा वाचवला होता माझा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 18:15 IST

पद्मिनी यांनी इंडियन आयडल या कार्यक्रमात याविषयी सांगितले.

ठळक मुद्देपद्मिनी कोल्हापुरेंनी सांगितले की, दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी मला दोनवेळा आगीच्या तावडीतून वाचवले होते. होगा तुमसे प्यारा कौन या गाण्याच्या शूटिंगदरम्यान संपूर्ण सेटला आग लागली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा प्रेमरोगच्या शूटिंगवेळी आग लागली होती.

भारत हा प्रतिभा आणि अनेक क्षेत्रातील गुणवंतांचा देश आहे. याच प्रतिभेला चालना देण्यासाठी सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडल दरवर्षी नवोदित प्रतिभावंतांसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते. या वर्षी प्रतिभेने आणखी उच्च पातळी गाठली आहे. या विकेंडचा एपिसोड अधिक स्पेशल करण्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि पूनम ढिल्लो यांनी नुकतीच हजेरी लावली होती. 

इंडियन आयडल या कार्यक्रमाच्या शूटिंगदरम्यान त्यांनी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याविषयी पद्मिनी यांनी या कार्यक्रमात एक खास गोष्ट सांगितली. होगा तुमसे प्यार आणि ये जमीन.. या गाण्यांवर पवनदीपने जबरदस्त परफॉर्मन्स दिल्यानंतर त्यांनी ऋषी कपूर यांची ही आठवण उपस्थितांना सांगितली. 

इतकेच नव्हे पद्मिनी आणि पूनम यांनी त्या उपस्थित राहणार, त्या भागात पवनदीपचे गाणे ऐकायला मिळावे, अशी विशेष विनंती कार्यक्रमाच्या टीमला केली होती. हे ऐकून पवनदीपला प्रचंड आनंद झाला होता. 

पद्मिनी कोल्हापुरेंनी सांगितले की, दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी मला दोनवेळा आगीच्या तावडीतून वाचवले होते. होगा तुमसे प्यारा कौन या गाण्याच्या शूटिंगदरम्यान संपूर्ण सेटला आग लागली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा प्रेमरोग या ब्लॉगबस्टर चित्रपटाच्या शूटिंगवेळी आग लागली होती. ऋषी कपूर हे महान अभिनेतेच नव्हते तर उत्तम माणूसही होते. ते इतरांच्या मदतीसाठी नेहमीच सज्ज असत, त्यांनी दोनवेळा मला वाचवले. त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनातील आदर अनेक पटींनी वाढला. माझ्या प्रार्थनांमध्ये नेहमीच त्यांना स्थान असेल.”

पद्मिनी आणि ऋषी यांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असे. पद्मिनी आणि पूनम यांचा हा खास भाग प्रेक्षकांना या आठवड्यात पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :ऋषी कपूरपद्मिनी कोल्हापुरेइंडियन आयडॉलपुनम ढिल्लो