रितेश देशमुख आणि जेनेलियाने या कारणासाठी मानले महाराष्ट्र सरकारचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 07:45 PM2021-03-08T19:45:58+5:302021-03-08T19:46:44+5:30
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जेनेलिया डिसूझा आणि रितेश यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला.अर्थसंकल्पात 'ईस्टर्न फ्री वे' मार्गाला दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येईल अशी घोषणाही यावेळी अजित पवार यांनी केली. त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जेनेलिया डिसूझा आणि रितेश यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत.
अभिनेत्री जेनेलिया डिसूझा आणि अभिनेता रितेश देशमूख यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहे. दोघांनीही या संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
मुंबईची वाहतुक कोंडी लक्षात घेत महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना जोडणाऱ्या पुर्व मुक्त मार्गाची संकल्पना मांडली होती. त्यांच्या मुळेच हा मार्ग तयार होऊ शकला. त्यामुळे पूर्व मुक्त मार्गास माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्याची मागणी राज्याचे मत्स्यव्यवसाय, वस्त्रोद्योग, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी गेल्या वर्षी एका पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
या रस्त्याची लांबी १६.८ कि.मी. असून दक्षिण मुंबईतील पी डीमोलो रोड पासुन ते चेंबूर येथील पूर्व द्रुतगती मार्गास हा मार्ग जोडला जातो. सध्या हा रस्ता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. या रस्त्यास माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देणे ही त्यांच्या कार्याची पोचपावती असेल असेही त्यांनी पत्राच्या शेवटी नमूद केले होते.