मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) आपलं एक वेगळंच स्थान कायम केलं आहे. त्यानं मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाच्या आणि कर्तुत्वाच्या जोरावर यशाचं शिखर गाठलंय. संपूर्ण देशमुख घराणे राजकारणात सक्रिय असल्याने रितेश सुद्धा राजकारणात जाईल, असाच अनेकांचा अंदाज होता. पण रितेशने हा अंदाज खोटा ठरवत, अभिनयाची वाट निवडली. रितेश अनेकदा सोशल मीडियाद्वारे (Social Media) आपलं मत व्यक्त करत असतो. त्याने निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले आहे. रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख या जोडीच्या आगामी ‘वेड’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रितेशचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त जाणून घेऊया रितेशला जिनिलीया वहिनींचं वेडं नक्की कसं लागलं.
रितेश आणि जेनेलियाची लव्हस्टोरी कुठल्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. लग्नासाठी होकार द्यायला जेनेलियाने चक्क 8 वर्षे लावलीत, यावरून या लव्हस्टोरीचा अंदाज यावा. आज रितेश व जेनेलियाची लव्हस्टोरी नेमकी कशी सुरु झाली, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून रितेशने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात जेनेलिया त्याची हिरोईन होती. याच चित्रपटाच्या निमित्ताने रितेश व जेनेलियाची पहिल्यांदा नजरानजर झाली होती. पुढे चित्रपटाच्या सेटवर रितेशचा खरा स्वभाव जेनेलियाला हळूहळू कळू लागला आणि दोघांत मैत्री झाली. पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले, हेही दोघांना कळले नाही.
‘तुझे मेरी कसम’नंतर ‘मस्ती’ या चित्रपटात जेनेलिया व रितेश यांनी पुन्हा एकत्र काम केले. या सेटवर त्यांचे प्रेम अधिकच घट्ट झाले. पण तरीही जेनेलिया लग्नासाठी तयार नव्हती. रितेश आज ना उद्या राजकारणात जाईल, असे तिला वाटत होते. त्यामुळे लग्नासाठी होकार द्यायला तिने तब्बल 8 वर्षे लावली. पण रितेशपासून दूर राहणे तिलाही शक्य नव्हते. अखेर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतलाच. 2012 मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले.
वेडचित्रपटाच्या निमित्ताने लोकमत फिल्मी दिलेल्या मुलाखतीत जिनिलीयात एक चांगली गोष्ट म्हणजे कमिटमेंट आहे. मित्रांप्रती, तिच्या कुटुंबीयांप्रती, कामाप्रती...पण आई म्हणून तिची जी कमिटमेंट आहे ना, ती वेगळीच आहे. ती एक नवीनच जिनिलीया आहे आणि त्या जिनिलीयाचा मला अभिमान आहे, असं रितेश म्हणाला. साडी, डोळ्यात काजळ आणि ओले केस अशी जिनिलीया मला आजही वेड लावते, असंही रितेश म्हणाला.