Join us

रितेश देशमुख, जेनेलिया आणि सोनाक्षी सिन्हाने घेतली कोरोना लस, लोकांना केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 17:03 IST

अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया देशमुख यांनीही नुकतीच ही कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

देशभरात कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाये. याच कोरोनाला प्रतिबंधक असलेली लस आता नागरीक घेत आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी ही लस घेण्याचं आवाहन अनेक जण करत आहेत. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी ही लस घेतली आहे. लस घेतल्यानंतर सोशल मिडीयावर फोटो शेयर करून इतरांनाही लस घेण्याचं आवाहन केलं जात आहे..

अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया देशमुख यांनीही नुकतीच ही कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. सोशल मिडीयावर दोघांनी लस घेतानाचे फोटो शेयर केले आहेत.

त्यांनी फोटो शेअर करत म्हटले की, लस घेतली...चला या राक्षससोबत एकत्र लढूयात. 

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेदेखील लस घेतली असून तिने म्हटले की व्हॅक्सिन म्हणजे विजय. यासह अनेक कलाकारांनी सोशल मिडीयावर त्यांच्या लसीकरणाचे फोटो शेयर करत कोरोनापासून बचावर करण्यासाठी लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे.

 

यापूर्वी कोरोनाच्या दुसरे लाटेदरम्यान आपल्या चाहत्यांचा मूड बदलण्यासाठी रितेश आणि जेनिलियाने एक व्हिडीओ शेअर केला होता आणि चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या व्हिडीओत १९७५ साली धर्मात्मा चित्रपटातील लोकप्रिय ट्रॅक क्या खोह लगती हो हे ऐकायला मिळत आहे आणि ते दोघे हे गाणे गुणगुणताना दिसत आहेत.

जेनेलियाने या व्हिडीओला कॅप्शन देत कोरोनाचा उल्लेख केला होता आणि म्हटले होते की या कठीण काळात आपल्याला खूप काही शिकवले आहे आणि आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत वेळ व्यतित करण्याचा वेळ आहे.
टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजाकोरोनाची लस