Join us

Riteish-Genelia : लग्नानंतर दररोज नटून थटून बसायची जिनिलिया, एकेदिवशी रितेशकडे ढसाढसा रडली, वाचा हा धमाल किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 12:29 IST

Riteish Deshmukh-Genelia D'souza-Deshmukh Wedding Anniversary : संपूर्ण महाराष्ट्राचं लाडकं कपल रितेश आणि जिनिलिया देशमुख यांच्या लग्नाला आज १२ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने वाचा त्यांच्या लग्नानंतरचा धमाल किस्सा.

संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारे कपल म्हणजे रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया डिसुझा-देशमुख (Genelia D'souza-Deshmukh). हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. ते दोघे कायम चाहत्यांना कपलगोल्स देत असतात. दरम्यान आज त्यांच्या लग्नाला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. रितेश आणि जिनिलियाची लव्हस्टोरी खूप फिल्मी आहे. 

रितेश देशमुख आणि जिनिलियाला तुझे मेरी कसमच्या सेटवर प्रेम झाले होते. हा रितेशचा पहिला चित्रपट होता. कित्येक वर्ष रितेश आणि जिनिलियाच्या अफेयरबद्दल भनक लागू दिली नाही. २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले. मात्र लग्नानंतर एका गोष्टीमुळे जिनिलिया खूप वैतागली आणि एक दिवस तिला रडू कोसळले. याबद्दल खुद्द अभिनेत्रीनेच खुलासा केला होता. एका शोमध्ये ती म्हणाली की, देशमुख कुटुंबाची सून झाल्यानंतर दररोज ती ट्रेडिशनल कपडे परिधान करत होती. खरेतर तिला असे करायला कुणीच सांगितलेलं नव्हतं. लेडिज व्हर्सेस जेंटलमेनच्या दुसऱ्या सीझनमध्ये जिनिलियाने याबद्दल सांगितले.    

या गोष्टीला वैतागली होती अभिनेत्रीजिनिलियाने सांगितले की, जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मला वाटलं की ट्रेडिशनल कपडे घालावे लागतील. मी दररोज नटून थटून तयार व्हायचे आणि वैतागायचे की मला असं तयार व्हावं लागतंय? या शोमध्ये त्यावेळी तिच्यासोबत रितेशदेखील होता. रितेश म्हणाला की, मला काहीच कल्पना नव्हती कारण जिनिलिया दररोज अशी कुर्ता पायजमा का परिधान करते आहे. मला वाटले की पूजा वगैरे असेल आणि मला माहित नसेल.

जिनिलिया रितेशसमोर कोसळलं रडू तेव्हा जिनिलियाने खुलासा केला की, एक दिवस ती रितेशकडे रडली आणि म्हणाली की, आता माझ्याकडून हे होणार नाही. हे ऐकून रितेश गोंधळून गेला. त्याला कळलंच नाही ही कशाबद्दल बोलत आहे. तेव्हा त्याने तिला विचारलं की, कशाबद्दल बोलत आहेस. त्यावर जिनिलिया म्हणाली की, मी अशी दररोज तयार होऊ शकत नाही. तेव्हा उत्तरात रितेश म्हणाला की, मी स्वतः हैराण झालो होतो की जिनिलिया अशी का तयार होते. म्हणजे जिनिलियाच्या एका गैरसमजामुळे ती सगळं करत होती आणि या कारणामुळे एक दिवस ती रडू लागली.

दोन मुलांचे आहेत पालकजिनिलिया आणि रितेश एकमेकांसोबत खूश आहेत आणि वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत. त्यांना दोन मुलं आहेत.  

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजा