Join us  

"धकधक गर्ल"ला पाहताचा रितेशने केला वाकून नमस्कार, अंबानींच्या समारंभातील व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2024 11:26 AM

रितेशच्या एका व्हिडीओनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं.

गेल्या काही दिवसांपासून जिकडेतिकडे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्याची चर्चा आहे. नुकतंच राधिका आणि अनंत यांचा संगीत कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यात बॉलिवूडसह हॉलिवूड सिताऱ्यांनीही हजेरी लावली होती.  अनेक दिग्गजांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. अनंत अंबानी-राधिकाच्या प्रीवेडिंग सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यात रितेशच्या एका व्हिडीओनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं.

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याला रितेश आणि जिनिलीया यांनी हजेरी लावली. याच कार्यक्रमात 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित व तिचे पती डॉ. श्रीराम नेने हेदेखील सहभागी झाले. रितेश-जिनिलीया अन् माधुरी-श्रीराम या दोन्ही लोकप्रिय जोडप्याचा एक Inside व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितला रितेशने सर्वांसमोर वाकून नमस्कार केल्याचं दिसून येत आहे.  

अनंत-राधिकाच्या संगीत पार्टीत रेड कार्पेटवर रितेश-जिनिलीया पोज देत असताना माधुरीची एन्ट्री होते. यावेळी रितेशने तिचा मान राखत वाकून अभिवादन केलं. हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत असून नेटकरी रितेशचे कौतुक करताना थकत नाहीयेत. अंबानींच्या संगीत सोहळ्यासाठी रितेश-जिनिलीया यांनी खास लूक केला होता. जिनिलीयाने शेवाळी रंगाचा सुंदर असा गाऊन ड्रेस परिधान केला. तर रितेशने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी घातली होती. दोघेही या लूकमध्ये अतिशय रॉयल दिसत होते.

महाराष्ट्राच्या लाडक्या दादा-वहिनीवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केलाय. 'रितेश नेहमीच मोठ्यांचा आदर करतो', 'रितेश खरंच माणूस म्हणून खूप चांगला आहे',  'रितेशचे संस्कार त्याच्या मुलांमध्येही दिसतात', 'ही दोन्ही जोडपी खूपच सुंदर आहेत', अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. रितेशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास तो लवकरच हॉरर कॉमेडी असलेल्या  'ककुडा' (Kakuda) या सिनेमात झळकणार आहे.  ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी आताच हा सिनेमा सुपरहिट आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

टॅग्स :रितेश देशमुखसेलिब्रिटीबॉलिवूडमाधुरी दिक्षितजेनेलिया डिसूजा