Join us

लग्नाच्या वाढदिवशी रितेश देशमुखने शेअर केला व्हिडीओ; पाहून होईल हसू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2020 4:21 PM

‘हॅपी अ‍ॅनिव्हर्सरी बायको,’ असे लिहित त्याने हा व्हिडिओ शेअर केला

ठळक मुद्दे‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या निमित्ताने रितेश व जेनेलियाची पहिल्यांदा नजरानजर झाली होती.

बॉलिवूड सर्वाधिक चर्चेत असलेली मराठमोळी जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख. या दोघांची आॅफस्क्रिन आणि आॅनस्क्रिन केमिस्ट्री बघून लोक थकत नाहीत. सोशल मीडियावरचे त्यांचे व्हिडीओ असो की फोटो म्हणूनच क्षणात व्हायरल होतात. जेनेलियासोबतचे अनेक फोटो व व्हिडीओ रितेश शेअर करत असतो. मग लग्नाच्या वाढदिवशी तो आपल्या लाडक्या बायकोला कसा विसरेल? आज लग्नाच्या आठव्या वाढदिवशी रितेशने मजेशीर व्हिडीओ शेअर केला. ‘हॅपी अ‍ॅनिव्हर्सरी बायको,’ असे लिहित त्याने हा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडीओ इतका मजेशीर आहे की, तुम्हाला हसू आवरणार नाही.

होय, या व्हिडीओमध्ये जेनेलिया अगदी प्रेमाने आपल्या लग्नाचे फोटो रितेशला दाखवतेय. मात्र हे फोटो पाहताना रितेशच्या चेह-यावरचे भाव बघण्यासारखे आहेत. हतबल नवºयासारखे त्याच्या चेहºयावरचे भाव बदलतात. सर्वात मजेशीर बाब म्हणजे या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला असणारे गाणे. ‘जिन जख्मों को वक्त भर चला है, तुम क्यों उन्हे छेडे जा रहे हो...’, हे गाणे व्हिडीओत बॅकग्राऊंडला वाजतेय. हा व्हिडीओ पाहून तुमचे मनोरंजन नक्की आहे. जेनेलिया मात्र या व्हिडीओवर काय प्रतिक्रिया देईल, ते मात्र ठाऊक नाही.

 2003 मध्ये  ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून रितेशने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात जेनेलिया त्याची हिरोईन होती. याच चित्रपटाच्या निमित्ताने रितेश व जेनेलियाची पहिल्यांदा नजरानजर झाली होती. ‘तुझे मेरी कसम’नंतर ‘मस्ती’ या चित्रपटात जेनेलिया व रितेश यांनी पुन्हा एकत्र काम केले. या सेटवर त्यांचे प्रेम अधिकच घट्ट झाले. पण तरीही जेनेलिया लग्नासाठी तयार नव्हती. रितेश आज ना उद्या राजकारणात जाईल, असे तिला वाटत होते. त्यामुळे लग्नासाठी होकार द्यायला तिने तब्बल 8 वर्षे लावली. पण रितेशपासून दूर राहणे तिलाही शक्य नव्हते. अखेर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतलाच. 3 फेब्रुवारी 2012 विवाहबंधनात अडकले. 

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजा