Join us

सत्यापेक्षा सामर्थ्यवान काहीच नाही...! रिया चक्रवर्तीसाठी रितेश देशमुखने केले ट्वीट

By रूपाली मुधोळकर | Published: October 13, 2020 12:14 PM

सुशांत प्रकरणावर पहिल्यांदा बोलला रितेश देशमुख

ठळक मुद्दे7 ऑक्टोबरला रियाची जेलमधून सुटका झाली आहे. जवळपास महिनाभराने तिला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक केली होती. यानंतर महिनाभर तुरुंगात राहिल्यानंतर नुकतीच रियाची जामिनावर सुटका झाली. रियाला जामीन मिळताच बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी तिच्या सपोर्टमध्ये सोशल मीडियावर व्यक्त झाले होते. यात आता आणखी एका अभिनेत्याचे नाव समाविष्ट झाले आहे.तो म्हणजे रितेश देशमुख.रिया चक्रवर्तीने कालच पोलिसांत तिची शेजारीण डिंपल थवानीविरोधात तक्रार दाखल केली.

सुशांतच्या मृत्यूच्या एक दिवसआधी म्हणजे, 13 तारखेला तो व रिया सोबत होते, आपण त्यांना एकत्र पाहिले होते, असा दावा डिंपलने केला होता. मात्र सीबीआयसमोर डिंपल या दाव्यावरून पलटली आणि रियाने खोटा दावा करणा-या डिंपलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. डिंपलने आपल्यावर खोटे आरोप करत, प्रकरणाला चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला, असे रियाने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. रिया चक्रवर्तीने शेजारी महिलेविरोधात  तक्रार दाखल केल्यानंतर रितेशने ही प्रतिक्रिया दिली आहे. ‘तुला लढण्याचे बळ मिळो रिया.सत्यापेक्षा सामर्थ्यवान काहीच नाही,’ असे ट्वीट रितेशने केले आहे.

 सीबीआयसमोर रिया चक्रवर्तीच्या शेजारी महिलेचा युटर्न

रिया चक्रवर्तीची शेजारीण डिंपल थवानीने सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी एक दिवस, म्हणजे 13 जूनला रियाला आणि सुशांतला एकत्र पाहिल्याचा दावा केला होता. तिच्या या दाव्याने खळबळ माजली होती. यानंतर सीबीआय टीमने डिंपल थलावीची चौकशी केली. सुशांतच्या आत्महत्येपूर्वी एक दिवस सुशांत आणि रियाला एकत्र पाहिले का? असा सवाल सीबीआयने डिंपलला विचारला तेव्हा मात्र तिने आपला जबाब पलटवला. रिया आणि सुशांत आत्महत्येपूर्वी भेटले होते, असे मी कोणाकडून तरी ऐकले होते. मी स्वत: त्यांना एकत्र पाहिले नाही, असा जबाब तिने दिला. तिच्या या बदललेल्या जबाबामुळे तपासाला एक वेगळाच ट्विस्ट मिळाला आहे.

मी नाही पाहिले, कोणाकडून तसे ऐकले होते...! सीबीआयसमोर रिया चक्रवर्तीच्या शेजारी महिलेचा युटर्न

SSR Case : रियाने शेजारणीविरोधात पत्र लिहून केली सीबीआयला तक्रार  7 ऑक्टोबरला रियाची जेलमधून सुटका झाली आहे. जवळपास महिनाभराने तिला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला. रिया चक्रवर्तीला 8 सप्टेंबर रोजी एनसीबीने केली होती.  रियासह सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंत यांचा जामीन अर्ज देखील खंडपीठाने मंजूर केला. तर रियाचा भाऊ शोविक आणि अब्दुल बसीथ परिहारचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.  

टॅग्स :रितेश देशमुखरिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूत