Join us

माझ्या बायकोचं नाव ‘जेनेलिया’ नाही...! रितेश देशमुखनं इतक्या वर्षानंतर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 5:36 PM

बायकोच्या वाढदिवसाला रितेशचं ट्वीट अन् चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

ठळक मुद्देरितेशने जिनिलियाला वाढदिवसाच्या मस्त शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्यासोबतच्या सुंदर क्षणांचा व्हिडीओ शेअर करत, हॅपी बर्थ डे बायको असे त्याने लिहिले आहे.

2003 मध्ये  ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh ) त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात त्याची हिरोईन जिनिलिया (जेनेलिया नाही, जिनिलिया). होय, याच चित्रपटाच्या निमित्ताने रितेश व जिनिलियाची (Genelia D'Souza) पहिल्यांदा नजरानजर झाली होती. हैदराबाद विमानतळावर दोघेही पहिल्यांदा भेटले. आश्चर्य वाटेल, पण या पहिल्या भेटीत जिनिलियाने रितेशला जराही भाव दिला नव्हता. कारण त्यावेळी रितेशचे वडील विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्र्याचा मुलगा असल्याने रितेश गर्विष्ठ असेल, असा जिनिलियाचा समज झाला होता. पण तिचा हा समज लवकरच दूर झाला आणि रितेश व जिनिलिया एकमेकांत कधी गुंतले ते दोघांनाही कळलेच नाही. आज रितेश व जिनिलिया बॉलिवूडमधील सर्वांचे लाडके आणि क्यूट कपल आहे. आज 5 ऑगस्ट रोजी जिनिलियाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतेय आणि अशात तिचा पती रितेश देशमुखचे एक ट्वीट जाम चर्चेत आहे. होय, लग्नानंतर इतक्या वर्षांनी रितेशने बायकोच्या नावाचा खुलासा केला आहे.

अनेकजण जिनिलियाला शुभेच्छा देताना तिचे नाव चुकीचे लिहित आहेत. ते पाहून रितेशला कदाचित राहावले नाही आणि त्याने हे ट्वीट केले. ‘माझ्या बायकोचे नाव ‘जिनिलिया’ आहे, जेनेलिया नाही,’ असे ट्वीट रितेशने केले आहे.

 त्याच्या या ट्वीटवरही युजर्सनी एकापेक्षा एक भारी कमेंट्स केल्या. हो का? मग आता उखाणा घे, असे एका युजरने लिहिले. जेनेलिया व जिनिलिया दोन्ही मस्त आहेत ना, असे दुस-या एका युजरने लिहिले.रितेशने केलेल्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तरी पण हॅपी बर्थ जेनेलियाच, अशी कमेंट एका युजरने केली आहे. तुम्ही सांगिल्यावर समजलं दादा, अशी भारी कमेंटही लक्षवेधी ठरली आहे.

 हॅपी बर्थ डे बायको...रितेशने जिनिलियाला वाढदिवसाच्या मस्त शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्यासोबतच्या सुंदर क्षणांचा व्हिडीओ शेअर करत, हॅपी बर्थ डे बायको असे त्याने लिहिले आहे. जगातील सर्वात स्पेशल व्यक्ती, असेही त्याने म्हटले आहे.

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजा