अभिनेता रितेश देशमुख(Riteish Deshmukh)चे दिग्दर्शन आणि अभिनीत वेड (Ved Marathi Movie) चित्रपट ३० डिसेंबरला रिलीज झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन महिना उलटला तरीही अद्याप या चित्रपटाचे क्रेझ अद्याप संपलेले नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आहे. वेडचे ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन ७०.९० कोटी इतके झाले असून, नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन ५८.११ कोटी इतके आहे. एकूण ३१ दिवसात वेडने ही कमाई केली. एकीकडे वेडमुळे चर्चेत असणारा रितेश देशमुख आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात त्याने चाहत्यांना लग्नाबाबत अजब सल्ला दिला आहे.
रितेश देशमुखने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तो त्याच्या चाहत्यांना सांगतो आहे की, जीवनात या तीन गोष्टी करू नका. पहिलं म्हणजे घरातल्यांच्या परवानगीने लग्न करू नका, दुसरं म्हणजे प्रेम करुन लग्न करू नका आणि लग्नच करु नका. असे म्हटल्यावर मागे जिनिलिया देशमुख येते आणि रितेश गप्प बसतो.
रितेशने हा मजेशीर व्हिडीओ शेअर करत लग्नाबाबत माझे विचार असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. रितेशच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळते आहे. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
वेड प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात रितेश-जिनिलिया देशमुखच्या 'वेड' सिनेमाने सर्वाधिक कमाई केली होती. पहिल्या आठवड्यातील सिनेमाचे कलेक्शन २०.६७ कोटींचे आहे. दुसऱ्या आठवड्यात हा आकडा २०.१८ कोटींवर पोहोचला. त्यांनंतर तिसऱ्या आठवड्यातील वेडची कमाई ०९.०५ कोटी आणि चौथ्या आठवड्यातील कमाई ६.११ कोटी अशी होती. आता पाचव्या आठवड्यात वेडच्या कमाईचा वेग मंदावला आहे. आता वेडचे ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन ७०.९० कोटी तर नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन ५८.११ कोटी आहे.