लॉकडाउनमध्ये समोर आला रितेश देशमुख व जेनेलिया डिसूझाच्या रोमांसचा व्हिडिओ, होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 12:10 PM2020-04-13T12:10:13+5:302020-04-13T12:10:56+5:30
रितेश व जेनेलियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा या जोडीकडे पाहिलं जातं. 'तुझे मेरी कसम' या सिनेमातून दोघांनी बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल ठेवलं आणि याच सिनेमातून दोघं आयुष्यभराचे जोडीदार बनले. रितेश व जेनिलिया यांच्या लग्नाला नुकतीच ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र आता रितेशने इंस्टाग्रामवर जेनेलियावर प्रेम नसल्याचे सांगितलं आहे.
रितेश देशमुखने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रितेश देशमुखने मेरा दिल भी कितना पागल है या गाण्यातून जेनेलियावर प्रेम व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ शेअर करून रितेशने कॅप्शन दिले आहे की, लॉकडाउनमध्ये प्रेम... जेनेलियाचे फेव्हरिट गाणे साजन.
रितेश व जेनेलियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे.
जेनेलिया आणि रितेशच्या प्रेम प्रकरणाला तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या चित्रीकरणापासूनच सुरुवात झाली. या चित्रपटाचे चित्रीकरण हैद्राबादमध्ये सुरू असल्याने या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्यांनी एकमेकांसोबत खूप वेळ घालवला होता. चित्रीकरण संपल्यावर मुंबईत परतल्यावर ते दोघे एकमेकांना मिस करू लागले. एकमेकांना भेटण्याची ते संधीच शोधत असत. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले हे त्या दोघांना देखील कळले नव्हते.
जेनेलिया आणि रितेश यांचे अफेअर सुरू झाल्यानंतर त्यांना लगेचच लग्न करायचे होते. पण रितेशनचे वडील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा सुरुवातीला रितेश आणि जेनेलियाच्या लग्नाला विरोध होता.
जेनेलिया ही ख्रिश्चन तर रितेश हा हिंदू असल्याने विलासरावांना हे लग्न मान्य नव्हते. पण काही काळांनी त्यांचा विरोध मावळला आणि रितेश आणि जेनेलिया यांचे लग्न धुमधडाक्यात झाले. त्या दोघांनी ख्रिश्चन आणि हिंदू दोन्ही पद्धतीने विवाह केला.