हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या रितेश देशमुख वेगवेगळ्या कारणामुळे प्रसिद्धीच्या झोतात येत असतो. बिझी शेड्युअलमधून वेळ काढत नुकताच रितेश देशमुख पत्नी जेनिलाय डिसोझासह एका हॉटेल बाहेर दिसला. रितेश देशमुला पाहताच मीडियाच्या कॅमे-यांनी त्याला घेरले होते. एरव्ही कॅमेरा दिसताच पोजवर पोज देणारा रितेश मात्र यावेळी त्याचा चेहरा लपवताना दिसला.
जेनिलियाही थोडा वेळ कळालच नाही की, नेमके रितेशला झाले तरी काय. यावेळी रितेशन पिंक आणि ब्लु कलरची जीन्स घातली होती तर जेनिलियाही नोमेकअप लुकमध्ये पाहायला मिळाली.
रितेशहा स्वभाव हा कॉमेडी असल्यामुळे तो सा-याबरोबरच तसाच हसत खेळत असतो. यावेळीही मस्तीचाच भाग म्हणून त्याने पोज चेहरा लपवताना पोज देत मस्ती करताना दिसला.
‘हाऊसफुल’, ‘ग्रँड मस्ती’सारख्या चित्रपटांतून लोकप्रियता मिळवणा-या रितेशला विनोदी भूमिकांसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. रितेश देशमुख हाऊसफुल 4 सिनेमात झळकणार आहे. येत्या 25 तारखेला दिवाळीच्या मुहूर्तावर सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यासह सिनेमात बॉबी देओल, अक्षय कुमार यांच्याही खास भूमिका आहेत. सध्या संपूर्ण स्टारकास्ट प्रमोशनमध्ये बिजी आहे.
त्याचे फिल्मी करिअर पाहता रितेश देशमुखने विनोदी व्यक्तिरेखाचा जास्त साकारल्या आहेत. साचेबध्द कामात अडकायचे नसून वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारण्याची इच्छा असून विनोदी भूमिका करण्याचा कंटाळा आला असल्याचे त्याने म्हटले होते. याआधी केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळ्या ठरतील अशा कोणत्या भूमिका कराव्यात हे समजत नसल्याचे रितेशने सांगितले होते.