Join us

Lok Sabha Elections Result 2024: लोकसभेचा निकाल, अभिनेता रितेश देशमुखचं सूचक ट्वीट: म्हणाला, 'EVM...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 17:18 IST

Lok Sabha Elections Result 2024: निकालाच्या दिवशी रितेश देशमुखचं ट्वीट

Lok Sabha Elections Result 2024: देशात लोकसभा निवडणूकांची मतमोजणी सुरु आहे. अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) स्वत: राजकारणी कुटुंबातून येतो. त्याचे वडील विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते. रितेश नेहमीच राजकीय मत व्यक्त करताना दिसतो. आज देशाचं लक्ष लागलेल्या या निकालावर रितेशनेही एका वाक्यात भाष्य केलं आहे. ट्विट करत त्याने म्हणणं मांडलं आहे.

अभिनेता रितेश देशमुखचंही आजच्या निकालाकडे लक्ष आहे. मतदानाच्या दिवशी त्याने संपूर्ण कुटुंबासह लातूला जाऊन मतदान केलं होतं. आज निकालाच्या दिवशी सकाळीच त्याने ट्वीट करत लिहिले, 'EVM - Every Vote Matters' म्हणजेच प्रत्येक मत महत्वाचं आहे. रितेशने अशी सूचक पोस्ट करत EVM वर भाष्य केले आहे.

रितेशच्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंट करत निकालावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'नक्की तुमचा इशारा कुठे आहे' अशी कमेंट एका युझरने केली आहे. तर 'परिस्थितीनुसार अर्थ बदलला' असं एकाने म्हटलं आहे.

रितेश देशमुखच्या लातूरमध्ये काँग्रेसे डॉ शिवाजी काळगे आघाडीवर आहेत. भाजपाच्या सुधाकर श्रृंगारे यांना त्यांनी मागे टाकले आहे. महाराष्ट्रात सध्या चकीत करणारे निकाल पाहायला मिळत आहेत.

टॅग्स :रितेश देशमुखलोकसभा निवडणूक २०२४ निकालबॉलिवूडमराठी अभिनेता