Join us

तुझ्यासोबत असणं ही माझ्या आयुष्यातील..रितेश देशमुखने जेनेलियासाठी लिहिली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 4:46 PM

Riteish Deshmukh and Genelia 10th wedding anniversary: लग्नाच्या वाढदिवसा निमित्त रितेश देशमुखने जेनेलियासाठी एका खास रोमाँटिक पोस्ट लिहिली आहे

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपल म्हणजे रितेश देशमुख (Ritesh Deshmukh)  आणि जेनेलिया(Genelia ). ऑनस्क्रीनवर एकत्र झळकणाऱ्या या जोडीची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीदेखील चाहत्यांना विशेष आवडते. आज  रितेश देशमुख आणि जेनेलिया यांच्या लग्नाला 10 वर्षे (Riteish Deshmukh and Genelia 10th wedding anniversary) झालीत. लग्नाच्या वाढदिवसा निमित्त रितेश देशमुखने जेनेलियासाठी एका खास रोमाँटिक पोस्ट लिहिली आहे आणि त्यासोबत काही फोटोदेखील शेअर केले आहेत. रितेश लिहितो, तुझ्यासोबत असणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट आहे. सुख- दुःख, संघर्ष, भीती, आनंद  एकत्र वाटून आपण हा प्रवास एकमेकांचा हात धरून केला आहे. तुझ्या सोबत असल्‍याने मला वाटते की मी काहीही करू शकतो.  धन्यवाद तुझा असल्याबद्दल. आय लव्हू जेनेलिया..

रितेश जेनेलिया पहिल्यांदा कधी भेटले?‘तुझे मेरी कसम’नंतर ‘मस्ती’ या चित्रपटात जेनेलिया (Genelia) आणि रितेश (Ritesh Deshmukh)   यांनी पुन्हा एकत्र काम केले. या सेटवर त्यांचे प्रेम अधिकच घट्ट झाले. पण तरीही जेनेलिया लग्नासाठी तयार नव्हती. रितेश आज ना उद्या राजकारणात जाईल, असे तिला वाटत होते. त्यामुळे लग्नासाठी होकार द्यायला तिने तब्बल 8 वर्षे लावली. पण रितेशपासून दूर राहणे तिलाही शक्य नव्हते. अखेर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतलाच. 2012 मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले. आता या दोघांना दोन मुलं आहेत.

जेनेलिया करणार कमॅबक लग्नानंतर जेनेलिया संसारात रमली मात्र आता 10 वर्षांनी कमबॅक करण्यास ती सज्ज झाली. मुंबई फिल्म कंपनीच्या सहाव्या मराठी चित्रपटातून जेनेलिया पुन्हा एकदा कलाविश्वात पदार्पण करत आहे. 'वेड' असं तिच्या आगामी चित्रपटाचं नाव असून या चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. यापूर्वी जेनेलियाने हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, 'वेड' हा तिचा पहिलाच मराठी चित्रपट असणार आहे.

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजा