Join us

  ‘उज्मा’च्या कथेत होणार तब्बूची एन्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 6:00 AM

कहानी, कमांडो, एअरलिफ्ट, पिंक, रेड अशा दमदार चित्रपटांचे पटकथा लेखक रितेश शाह हे लवकरच उज्मा अहमदची कहाणी घेऊन येत आहेत.

ठळक मुद्देआधी या भूमिकेसाठी परिणीती चोप्राच्या नावाची चर्चा होती. पण ताजी चर्चा खरी मानाल तर मेकर्सने इलियानाला घेण्याचा निर्णय जवळ जवळ पक्का केला आहे.

कहानी, कमांडो, एअरलिफ्ट, पिंक, रेड अशा दमदार चित्रपटांचे पटकथा लेखक रितेश शाह हे लवकरच उज्मा अहमदची कहाणी घेऊन येत आहेत.  एका पाकिस्तानी तरुणाने बंदुकीच्या धाकावर तिला लग्न करण्यास भाग पाडले,असा आरोप करत उज्माने न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर इस्लामाबाद उच्च न्यायालयाने उज्माला मायदेशी परतण्याची परवानगी दिली होती. पण याऊपरही मायदेशी परतू दिले जात नसल्याने उज्माने भारतीय उच्चायुक्तालयात आसरा घेतला होता.  याच उज्माच्या आयुष्यावरचा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. 

उज्मा एक भारतीय महिला आहे. एका पाकिस्तानीने नशेचे औषण देत आणि बंदुकीचा धाक दाखवत तिच्याशी बळजबरीने विवाह केला होता. यादरम्यान उज्माला पाकिस्तानात बºयाच शारीरिक व मानसिक छळाला सामोरे जावे लागले. पुढे उज्माने भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीची याचना केली आणि स्वराज यांनी तत्काळ कारवाई करत, उज्माला पाकिस्तानातून बाहेर काढले. उज्माच्या आयुष्यातील हे प्रखर वास्तव चित्रपटरूपातून पडद्यावर येत आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण चित्रपटाबद्दलची एक ताजी बातमी समोर आली आहे. त्यानुसार, अभिनेत्री तब्बू या चित्रपटात सुषमा स्वराज यांची भूमिका साकारताना दिसू शकते. या चित्रपटात उज्माची भूमिका साकारण्यासाठी मेकर्सनी अभिनेत्री इलियाना डिक्रूज हिच्याशी संपर्क साधल्याचेही कळतेय.आधी या भूमिकेसाठी परिणीती चोप्राच्या नावाची चर्चा होती. पण ताजी चर्चा खरी मानाल तर मेकर्सने इलियानाला घेण्याचा निर्णय जवळ जवळ पक्का केला आहे.  भारतीय उपायुक्त जे. पी. सिंह यांच्या भूमिकेसाठी अनिल कपूर यांना घेण्यास मेकर्स उत्सूक आहेत. समीर दीक्षित हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.  

टॅग्स :तब्बूइलियाना डीक्रूज