ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविकने मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असून त्यावर उद्या सुनावणी होणार आहे.
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. रियाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ८ सप्टेंबरला अटक केली. त्यानंतर २२ सप्टेंबरपर्यंत तिला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यादरम्यान रिया आणि शौविकने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. ज्याच्यावर उद्या म्हणजे २३ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.
रिया चक्रवर्ती आणि शौविक चक्रवर्ती या दोघांना दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसाठी ड्रग्स खरेदी केल्याचा आरोपाखाली अटक केली होती. सुरूवातीला रियाने ड्रग्स घेतले असल्याचे नाकारले होते पण नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या चौकशीत रियाचा भाऊ शौविकने ही बाब कबूल केली की रियाची गौरवसोबत केलेले चॅट योग्य आहे आणि तो स्वतः सुशांतसाठी ड्रग्स अरेंज करत होता ज्यासाठी पैसे त्याची बहिण रिया चक्रवर्ती देत होती.
सुशांतने ९ जूनला बहीण मीतूला केला होता SOS कॉल, म्हणाला होता - हे लोक माझा जीव घेतील...
असा झाला दीपिकाच्या नावाचा खुलासा
आज तकने एनसीबीच्या अधिका-यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सुशांत सिंग राजपूतची टॅलेंट मॅनेजर जया शाहच्या एका कथित चॅट मध्ये ‘डी’ आणि ‘के’ या इंग्रजी आद्याक्षरांचा उल्लेख आहे. एनसीबीच्या सुत्रांच्या माहितीनुसार डी’चा अर्थ दीपिका पादुकोण आणि ‘के’चा अर्थ करिश्मा (जया शाहची सहकारी).
ड्रग्ज प्रकरणात नम्रता शिरोडकरचे नाव येताच बिथरले महेशबाबूचे फॅन्स, असे झालेत रिअॅक्ट
एनसीबीच्या ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीत डी, एन, एस, के अशी नावे समोर आली आहे. यात डीचा अर्थ दीपिका पादुकोण, एन म्हणजे नम्रता शिरोडकर, एस म्हणजे श्रद्धा कपूर आणि के म्हणजे करिश्मा यांची नावे समोर आली आहेत. एनसीबीच्या हाती काही व्हाट्सअॅप चॅट लागले आहेत. यात दीपिका व करिश्मा ड्रग्जबद्दल बोलत आहेत. तुझ्याजवळ माल आहे का? असे दीपिका यात करिश्माला विचारते. यावर हो, पण घरी आहे. मी सध्या वांद्रयात आहे, असे उत्तर करिश्मा देते.