Rhea Chakraborty : चालता चालता तोंडावर पडत होती रिया, फोटोग्राफर्सवरच भडकली, युझर्स म्हणाले, सुशांतसिंगच्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 10:05 AM2023-01-18T10:05:53+5:302023-01-18T10:06:51+5:30

सुशांतसिंग राजपुत प्रकरणी प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती पडता पडता वाचली. व्हिडिओ झाला व्हायरल

riya chakraborty slipped while walking got angery on paparazi users trolled her | Rhea Chakraborty : चालता चालता तोंडावर पडत होती रिया, फोटोग्राफर्सवरच भडकली, युझर्स म्हणाले, सुशांतसिंगच्या...

Rhea Chakraborty : चालता चालता तोंडावर पडत होती रिया, फोटोग्राफर्सवरच भडकली, युझर्स म्हणाले, सुशांतसिंगच्या...

googlenewsNext

Rhea Chakraborty : सुशांतसिंग राजपुत (Sushant Singh Rajput) प्रकरणी प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती सध्या पापाराझींसमोर (Paparazi) भलतीच अॅक्टिव्ह असते. कॅमेरा दिसताच ती कधी भाव खाते तर कधी खूश असते. यामुळे ती अनेकदा सोशल मीडियावरट्रोलही होत असते. आता तिचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती चालता चालता अडखळते आणि पडणारच असते मात्र वेळीच सावरते. यानंतर मात्र तिचा पारा चढतो आणि ती पापाराझींवरच राग काढते.

सध्या बीटाऊन मध्ये पापाराझींचं कल्चर भलतंच वाढलं आहे. सेलिब्रेटिंना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी सगळेच धडपड करत असतात. रिया चक्रवर्ती नुकतीच एका दुकानात जात असताना पापाराझींनी तिचा नेहमीप्रमाणे पाठलाग केला. यावेळी रियाचा तोल गेला आणि ती पडणारच होती तितक्यात तिने स्वत:ला सावरलं. यावर पापाराझीही 'अरे हळू जरा' असं म्हणाले. यानंतर रिया थोडी चिडली आणि म्हणाली 'तुम्ही असा पाठलाग कराल तर हेच होईल'

रियाच्या या व्हिडिओवर तुफान कमेंट्स येत आहेत.सोशल मीडियावर ताही चाहते रियाला अजुनही सुशांतसिंग राजपुतच्या मृत्यूला जबाबदार धरतात आणि तिच्यावर कमेंट करत असतात. एका युझरने तिला पुन्हा त्या गोष्टीवरुन ट्रोल केले. ''कोणी पाठलाग केला म्हणून नाही तर सुशांतच्या मृत्यूला जबाबदार असल्यामुळेच तुझ्यासोबत हे घडलं' अशी एकाने कमेंट केली आहे.

Web Title: riya chakraborty slipped while walking got angery on paparazi users trolled her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.