बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येबाबत अद्याप काहीच निष्कर्ष समोर आलेला नाही. या प्रकरणात मुख्य आरोपी म्हटल्या जाणाऱ्या रिया चक्रवर्तीला एनसीबीने अटक केली होती. काही दिवसांपूर्वी रिया चक्रवर्तीने सुशांतच्या बहिणी मीतू सिंग आणि प्रियंका सिंग विरोधात तक्रार दाखल केली होती. आता या प्रकरणात रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी खुलासा केला आहे. त्यांनी रिया ८ जूनला सुशांतचे घर का सोडून गेली होती, यामागचे कारण सांगितले आहे.
रिया चक्रवर्तीने सुशांतच्या बहिणी मीतू सिंग आणि प्रियंका सिंगवर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रिस्क्रिप्शनमध्ये बदल करून सुशांतला चुकीची औषधं दिल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करणे आमचे कर्तव्य असल्याचे म्हणत प्रतिज्ञापत्र सादर केले आहे आणि रियाचा एफआयआर दाखल करून घेतला आहे. डॉक्टरांनी सुशांतला ड्रग्सचे सेवन बंद करण्यास सांगितले होते. त्यानंतर त्याने रिया चक्रवर्तीचा आणि डॉक्टरांचा सल्ला न ऐकल्यामुळे अखेर सुशांतच्या इच्छेनुसार रियाने त्याचे घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचे रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितले.
सुशांतच्या बहिणींनीविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका रद्द करण्यासाठी पोलिसांनी सोमवारी हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले. प्रियांका आणि मीतू यांच्याविरूद्ध एफआयआर नोंदवण्यात आला असून रिया चक्रवर्तीने दिलेल्या माहितीनुसार हा एफआयआर नोंदवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितलं. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानेशिंदे यांनी या दोन बहिणींवर आरोप केले होते. सुशांतच्या दोन्ही बहिणींनी त्याच्या मानसिक परिस्थितीचा अंदाज असताना देखील चुकीची औषधे दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. ८ जूनला प्रियंका सिंगने सुशांतला मेसेज करून काही औषधे सांगितली होती. ती औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय रुग्णाला देता येत नाहीत. तो गुन्हा ठरतो.