सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्ती एकमेकांच्या खूप जवळ होते. ते दोघे एकत्र वर्कआऊट, पार्टी व व्हॅकेशनवर जात असत. इतकंच नाही तर ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याचंही बोलले जात होते. आता काही दिवसांपूर्वी रियाचा बर्थडे होता, पण तिने यावेळी साजरा केला नाही. रियाच्या इंस्टाग्रामवरील व्हिडिओ पाहिले असतील त्यातील बरेच व्हिडिओ सुशांतच्या घरात बनवल्याचे बोलले जात आहे.रियाने हे व्हिडिओ शेअर केले आहेत आणि शूट करण्याचे क्रेडिट सिद्धार्थ पिटानीला दिले आहे. सिद्धार्थ सुशांतचा मित्र आहे आणि त्याच्यासोबत रहात होता.
रिया म्हणाली की सुशांतची परिस्थिती पाहून ती जास्त काहीच बोलली नाही. तिला वाटलं की सुशांत काही एकटा राहिल तर त्याला बरे वाटेल. त्यानंतर रिया तिथून निघून गेली आणि 14 जूनला सुशांतने आत्महत्या केल्याचे वृत्त आले.