सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सुशांतच्या वडील के के सिंगने त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर आरोप करत तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आता या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. पटना पोलीस स्थानकात के.के. सिंग यांनी तक्रार दाखल केली आहे. अशात आता सुशांत सिंग राजपूतची बहिण मीतू हिने काही खुलासा केला आहे.
बिहार पोलिसांनी आतापर्यंत मुंबईतील सुशांतची बहिण मीतू सिंग व त्याचा मित्र महेश कृष्णा शेट्टीचे स्टेटमेंट घेतले आहे. सुशांतची बहिण मीतू सिंगने सांगितले की, रिया चक्रवर्तीने सुशांतला पूर्णपणे स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवले होते. भूत प्रेताच्या कथा सांगून त्यांचे घर बदलायला लावले होते. बिहार पोलीस आज सुशांतचे बँक अकाउंट पडताळणीसाठी बँकेत जाणार आहे. सोबतच ज्या डॉक्टरांकडे सुशांतची ट्रीटमेंट चालू होती तिथे बिहार पोलीस चौकशी करणार आहे.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पटना पोलीस मुंबईत दाखल झाले आहेत. रिया चक्रवर्तीवर सुशांतचे वडील के के सिंग यांनी जे आरोप लावले आहेत त्यासाठी सुशांतची बहिण मीतू सिंग यांचे स्टेटमेंट महत्त्वाचे होते. आजतकशी सुशांतच्या वडीलांचे वकील संजय सिंग यांनी बातचीत केली. त्यावेळी त्यांनी रिया बिहा पोलिसांकडील प्रकरण मुंबईत परत का मागतेय, असा सवाल केला आहे.
संजय सिंग म्हणाले की, बिहार पोलिसांनी रियाच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि सीबीआय चौकशीदेखील करू शकतात. मुंबई पोलिसांनी फक्त सेलिब्रेटींना बोलवून त्यांच्याशी बातचीत केली पण एफआयआर दाखल केला नाही. आता मुंबई व बिहार पोलिस दोघेही या प्रकरणाचा तपास करत आहेत. तर रिया चक्रवर्तीने सुप्रीम कोर्टात अर्ज केला आहे ही या प्रकरणाची चौकशी मुंबईतच व्हावी.