Join us  

'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2024 2:39 PM

पोर्शे कार अपघातावरील रॅप सोशल मीडियावरही सध्या बरंच चर्चेत आलं आहे.

Pune porsche accident : पुण्यातील पोर्शे कार अपघात (Pune Porsche Car Accident) प्रकरणाची सध्या देशभरात चर्चा आहे. पुण्यात १९ मे रोजी एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श या कारने बाईक वरुन जाणाऱ्या तरुण-तरुणीला धडक दिली होती. या धडकेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. आरोपीला ३०० शब्दांचा निबंध लिहण्याच्या अटीवर जामीन मिळाला. ही बाब समोर येताच अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सगळीकडे संतापाची लाट उसळली. 

आरजे मलिष्का हिच पुण्यातील पोर्शे कार अपघातावरील रॅप सोशल मीडियावरही सध्या बरंच चर्चेत आलं आहे. आपल्या रॅपमधून तिनं पोर्शे कार अपघात ते त्यानंतर झालेल्या नाट्यमय घटनांवर टीका केली. 

कसं आहे तिचं रॅप ?

जब मैं छोटा बच्चा था, बडी शरारत करता था. मेरी गाडी ठुक ही जाती, बचाने आता बाप. मी पुण्यामध्ये राहतो, माझ्या बापाचीच खातो, माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा.पोर्शे बाहेर घेऊन गेले, दोन तरुण मेले,पिऊन होता गाडीत बसला, इसमे कोई नही मसला. ब्लेम ड्रायव्हर पे ठोकेंगे, मेरी लाईफ थोडी रोकेंगे. वकिल आहेत, आहे पैसा, तो डर कैसा और किसका? जिसने parody बनाया, इसपे एअआयआर लगायाअरेस्ट झाले हॉटेलवाले, दोन डॉक्टर अरेस्ट झाले, सस्पेंड झाले पोलीसवाले, पण मी?... फक्त लिहिला निबंध, पिझ्झाचा झाला प्रबंध, आय एम स्टील नाबालीक ना... मैं तो बच्च हु ना...जिसने parody बनाया उपसे एफआयआर लगाया,कारण बापाचा पैसा... तु रोकेगा कैसे??? पोर्शे कोणाची...बापाची..रस्ता कोणाचा..बापाचा... वकिल कोणाचा... बापाचा... Law and Order कोणाचा बापाचा... आआआहा... पब्लिकचा... तुझ्या बापाचे पैसे... देख रोकेंगे कैसे... कभी पोर्शे कभी Pathole, कभी Politics... कोई और झोल... Public Memory is Very Short भैय्या... सबसे बडा रुपय्या... मगर इस मेमरी की ना डुबे नैय्या.. इसलिए मै हुं ना.... 

 

सोशल मीडियावर Rj मलिष्काच्या या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी तिला समर्थनही दिले आहे. मलिष्काने याआधीही अनेक सुपरहिट गाणी बनवून चालू मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले होते. 'सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय काय?'  हे गाणे खूप सुपरहिट झालं होतं. तसेच मलिष्काचं सैराट सिनेमातील 'झिंग झिंग झिंगाट..' गाण्याच्या चालीवर तयार केलेलं 'गेली गेली मुंबई खड्ड्यात..' हे गाणंदेखील व्हायरल झालं होतं. 

टॅग्स :आर जे मलिष्कापुणेपुणे पोर्श अपघातअपघातसेलिब्रिटी