आर. माधवनचे मुंबईतील आलिशान घर बघून तुम्हीही म्हणाल Wow, एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 03:13 PM2020-10-14T15:13:31+5:302020-10-14T15:14:34+5:30

मनमौजी, आपल्याच धुंदीत आणि आपल्या अटी शर्तींवर जीवन जगणारे कलाकारही या चित्रपटसृष्टीत आहेत. त्यापैकी एक म्हणजे आर.माधवन.

R.Madhavan’s Lavish And Lovely Home In Mumbai | आर. माधवनचे मुंबईतील आलिशान घर बघून तुम्हीही म्हणाल Wow, एकदा पाहाच

आर. माधवनचे मुंबईतील आलिशान घर बघून तुम्हीही म्हणाल Wow, एकदा पाहाच

googlenewsNext

हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांचं जगणं, जीवनशैली आलिशान असते हे साऱ्यांना माहिती आहे. मात्र या गोष्टीला काही कलाकार अपवाद असतात. त्याची जीवनशैली अत्यंत सामान्य असते.

मनमौजी, आपल्याच धुंदीत आणि आपल्या अटी शर्तींवर जीवन जगणारे कलाकारही या चित्रपटसृष्टीत आहेत. त्यापैकी एक म्हणजे आर.माधवन. घर असंच आलिशान आहे. मुंबईतील त्याच्या  याच घराचे काही फोटो समोर आले आहेत.या घरात पत्नी, मुलगा आणि वडिलांसोबत तो राहतो.

या फोटोत आपल्या कुटुंबासह निवांत क्षणांचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे. माधवनच्या आलिशान घरावरुन त्याचं जगणंही आलिशान असल्याचे पाहायला मिळेल. घराचं इंटिरीअर सजवण्यासाठी त्याने  बरीच मेहनत घेतली आहे.  

घराच्या भिंतीवरही काही सुंदर विचार लिहिलेले पाहायला मिळतात. डायनिंगपासून पूल एरियापर्यंत घराचा कोपरा अन् कोपरा सजवण्यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली असून कुणाचंही लक्ष आकर्षित करेल. त्याने संपूर्ण घरात पांढऱ्या रंगाचे फर्निचर केले आहे. हे घर पाहून आपसुकच तुमच्या तोंडातून अतिसुंदर, अमेझिंग असे शब्द बाहेर पडले नाही तरच नवल

आर. माधवन हा दाक्षिणात्य सुपरस्टार असला तरी त्याने बॉलिवूडमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने रहना है तेरे दिल मैं, थ्री इडियट्स, तनू वेड्स मनू यांसारख्या अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. माधवनने छोट्या पडद्यापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई, सी हॉक्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि आर. माधवन आहेत कॉलेजपासूनचे फ्रेंड्स, वाचा त्यांच्या मैत्रीविषयी


त्याचे बालपण बिहारमध्ये गेले असले तरी त्याचे शिक्षण महाराष्ट्रात झाले आहे. कोल्हापूरमधील राजाराम कॉलेजमध्ये त्याने शिक्षण घेतले आहे. या कॉलेजमध्ये तो शिक्षक असताना त्याच्यासोबत पोलीस अधीक्षक नांगरे पाटील देखील होते. त्या दोघांची त्या काळापासून मैत्री आहे. काही वर्षांपूर्वी कॉलेजच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने माधवन आणि नांगरे पाटील यांनी दोघांनी देखील हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा दिला होता. आर माधवने सांगितले होते की, राजाराम कॉलेजमध्ये असताना मी खूप काही शिकलो. त्या काळात मला भेटलेल्या लोकांना मी आयुष्यभर विसरू शकत नाही. कॉलेजमधील दिवस हे माझ्यासाठी सर्वात चांगले होते. यावेळी माधवनने त्याच्या भाषणाची सुरुवात मराठीत केली होती.

Web Title: R.Madhavan’s Lavish And Lovely Home In Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.