एमटीव्हीचा लोकप्रीय शो ‘रोडिज्’चा जज राहिलेला रघुराम याचा गत जानेवारीत पत्नी सुगंधासोबत घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या सहा महिन्यानंतर रघुला आयुष्यात एक नवा जोडीदार मिळाला आहे. होय, रघुरामने गर्लफ्रेन्ड नेटली दि लुकसिओसोबत साखरपुडा केला. रघुराम व नेटली दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत होते. अतिशय सीक्रेट पद्धतीने हा साखरपुडा झाला. पण रघुरामच्या काही मित्रांनी या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले आणि या सीक्रेट एन्गेजमेंटचा खुलासा झाला. टोरंटोत झालेल्या या सोहळ्यात अभिनेता करणवीर व त्याची पत्नी सहभागी झाले होते.काही दिवसांपूर्वी रघुरामने नेटली (हे नाव तुम्ही याआधीही ऐकले असण्याची शक्यता आहे. होय, टीव्ही अभिनेता एजाज खानसोबत कधीकाळी रिलेशनशिपमध्ये असलेली तीच ती नेटली.) सोबतचा एक फोटो शेअर करत, तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती.
२०१६ मध्ये नेटली आणि रघु ‘आंखो ही आंखो में’ या गाण्यानिमित्त एकत्र आलेत आणि एकमेकांत गुंतले. पुढे रघुने पत्नी सुगंधासोबत घटस्फोट घेतला आणि आता रघुने नेटलीसोबतचे नाते जगजाहिर केले आहे. ‘काही वर्षाआधी आजच्याच दिवशी तू माझ्या आयुष्यात आली आणि माझा मी मला परत मिळालो. तुझ्यासोबत मी प्रेम अनुभवले, आनंद अनुभवला. तू माझ्या आयुष्यात आशा बनून आलीस. आय लव्ह यू...,’ अशी एक अतिशय भावूक पोस्ट रघुने लिहिली होती. . सोबत नेटलीसोबतचा एक फोटोही शेअर केला होता. नेटलीने ‘इंग्लिश विंग्लिश’,‘चेन्नई एक्सप्रेस’,‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ अशा अनेक चित्रपटांत गाणी गायली आहेत.