Join us

प्रियांका चोप्रा बॅकराऊंड डान्सरसोबत वागते वाईट, एका रिअ‍ॅलिटी शोमधील स्पर्धकाने दिली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 19:19 IST

प्रियांका एक अभिनेत्रीसोबतच एक खूप चांगली डान्सर देखील आहे. तिने तिच्या अनेक परफॉर्मन्समधून हे सिद्ध देखील केले आहे. पण ती बॅकराऊंड डान्सरला तुच्छ मानते असे एका व्यक्तीने नुकतेच एका रिअ‍ॅलिटी शोच्या दरम्यान म्हटले आहे.

ठळक मुद्देआमच्या शोला केवळ एक दिवस बाकी होता. आमच्या सगळ्यांची तालीम एकदम व्यवस्थित झाली होती. पण या शोच्या केवळ एक दिवस आधी प्रियांकाने डान्सच्या स्टेप्स बदलायला सांगितल्या आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना कित्येक तास पुन्हा तालमी करायला लागल्या.

प्रियांका चोप्राने आज तिच्या अभिनयाने बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्ये देखील तिचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. मिस वर्ल्ड हा किताब मिळाल्यानंतर प्रियांकाने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. तिने आजवर ऐतराज, बर्फी, मुझसे शादी करोगी, बाजीराव मस्तानी यांसारख्या अनेक चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिला तिच्या अभिनयासाठी आजवर अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. प्रियांकाने काहीच महिन्यांपूर्वी तिचा प्रियकर निक जोनाससोबत लग्न केले. 

प्रियांका एक अभिनेत्रीसोबतच एक खूप चांगली डान्सर देखील आहे. तिने तिच्या अनेक परफॉर्मन्समधून हे सिद्ध देखील केले आहे. पण ती बॅकराऊंड डान्सरला तुच्छ मानते असे एका व्यक्तीने नुकतेच एका रिअ‍ॅलिटी शोच्या दरम्यान म्हटले आहे.

रोडीज रिअल हिरो या कार्यक्रमातील एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ एमडिव्हीने त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे. रोडीज रिअल हिरो यामधील एका स्पर्धकाने प्रियांकाबाबत व्यक्त केलेले हे मत ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याने या कार्यक्रमात मला तिला मारायचे आहे असे म्हटले आहे. हे ऐकून परीक्षकांना काय बोलायचे हेच सुचत नव्हते. त्यावर या कार्यक्रमातील परीक्षक नेहा धुपियाने याचे कारण विचारले असता त्याने सांगितले की, प्रियांकासोबत त्याने बॅकराऊंड डान्सर म्हणून काम केले आहे. प्रियांकामुळे त्याला आणि त्याच्यासोबत डान्स करणाऱ्या सगळ्यांनाच एक दिवस उपाशी राहावे लागले होते.  

याविषयी त्याने पुढे सांगितले की, एका शो साठी आम्ही प्रियांकासोबत प्रॅक्टिस करत होतो. आमच्या शोला केवळ एक दिवस बाकी होता. आमच्या सगळ्यांची तालीम एकदम व्यवस्थित झाली होती. पण या शोच्या केवळ एक दिवस आधी प्रियांकाने डान्सच्या स्टेप्स बदलायला सांगितल्या आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना कित्येक तास पुन्हा तालमी करायला लागल्या. आमचा सगळ्यांचा यात इतका वेळ गेला की, आम्हाला जेवायला देखील वेळ मिळाला नाही. आम्ही सगळेच खूप थकलो होतो. प्रियांकाने ही गोष्ट एकदा नव्हे तर अनेकवेळा केली आहे. 

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनासएमटीव्ही