Join us  

Rocketry OTT Release: थिएटरनंतर OTT प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आर. माधवनचा रॉकेट्री, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 12:46 PM

Rocketry The Nambi Effect : 20 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने एकूण 40 कोटींचा बिझनेस केला आहे.

R.Madhavan : द नंबी इफेक्टने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. सुमारे 20 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने एकूण 40 कोटींचा बिझनेस केला आहे. 2 जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज झालेला हा चित्रपट आता रिलीजच्या 24 दिवसांनंतर OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे. Amazon प्राइमने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.

कधी रिलीज होणार सिनेमा?अ‍ॅमेझॉन प्राइमने ट्विट करून माहिती दिली आहे की आर माधवनचा चित्रपट 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट' 26 जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.  हा चित्रपट सर्व प्राइमच्या मेंबर्ससाठी उपलब्ध असेल की नाही हे ट्विटमध्ये स्पष्ट करण्यात आलेले नाही.  Amazon Prime वर अलीकडेच 'Pay per View' वर 'KGF: Chapter 2' रिलीज झाले आहेत. ज्या अंतर्गत प्राइम मेंबर्स आणि नॉन-प्राइम मेंबर दोघांनाही चित्रपट पाहण्यासाठी काही पैसे द्यावे लागले.

हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित होणार का?अ‍ॅमेझॉन प्राइमने केलेल्या ट्विटमध्ये 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट' ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोणत्या भाषेत रिलीज होईल याची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, ट्विटमध्ये शेअर केलेल्या पोस्टरमध्ये हिंदी भाषेचा उल्लेख करण्यात आलेला नाही. पोस्टरमध्ये फक्त तामिळ, कन्नड, तेलगू आणि मल्याळम भाषांचा उल्लेख आहे.

‘रॉकेट्री: द नम्बी इफेक्ट’ चित्रपटाबद्दल सांगायचे तर या चित्रपटात आर. माधवन डॉक्टर नम्बी नारायणन यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट भारतीय वैज्ञानिक आणि एअरस्पेस इंजिनिअर नम्बी नारायणन यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यांना खऱ्या आयुष्यात गुप्तहेरीच्या खोट्या केसमध्ये फसवण्यात आले होते. 

टॅग्स :आर.माधवनबॉलिवूडसेलिब्रिटी