Join us

प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बाल यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 9:42 AM

रोहित बाल यांची प्रकृती नाजूक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

 बी-टाऊनचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बाल यांची प्रकृती खालावली. फॅशन डिझायनर रोहित बाल  यांना एनसीआरमधील मेदांता हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. अनेक चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत.

रिपोर्टनुसार, रोहित बला यांच्या जवळच्या मित्राने सांगितले की, "रोहित बाल यांना तीन दिवसांपूर्वी मॉडेल सूरज धालियाने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ते बेशुद्ध पडले होते. आधी त्यांना मूलचंद रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर  त्यांची प्रकृती आणखी खालावल्यानंतर त्यांना मेदांतामध्ये दाखल करण्यात आलं."

त्यांना 2010 मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना स्वादुपिंडाचा त्रास देखील आहे जो गेल्या काही वर्षांमध्ये वाढत गेला. 62 वर्षीय रोहित गेल्या काही महिन्यांत अनेकदा आजारी पडला होते आणि त्यांना रुग्णालयात देखील दाखल करावं लागले होते. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहिल बाल यांना दारुचं व्यसन आणि इतर आरोग्य समस्यांमुळे रिहॅबमध्ये जावं लागलं होतं. त्यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गंभीर अवस्थेत मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांचा मित्र आणि अभिनेता अर्जुन रामपाल त्यांना भेटायलाही आला होता. मात्र उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं होतं.  त्यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गंभीर अवस्थेत मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.. मात्र उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. 

टॅग्स :सेलिब्रिटी