Join us

फक्त अवघे काही तास बाकी, प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 'सिंघम अगेन'चा ट्रेलर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 16:03 IST

दिग्दर्शक रोहित शेट्टीने अजय देवगण स्टारर सिंघम अगेनचा ट्रेलर कधी येणार याचा खुलासा केलाय.

सध्या अभिनेता अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या 'सिंघम अगेन' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे.  यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सिनेमाची रिलीज डेट जवळ आली आहे. पण, अद्याप ट्रेलर प्रदर्शित झालेला नाही. पण, आता  'सिंघम अगेन' च्या ट्रेलरची प्रेक्षकांना आणखी प्रतिक्षा करावी लागणार नाहीये. कारण, सिनेमाचा ट्रेलर कधी रिलीज होणार, याबाबत अपडेट समोर आलं आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टीनेअजय देवगण स्टारर सिंघम अगेनचा ट्रेलर कधी येणार याचा खुलासा केलाय. आज रोहितने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर सिंघम अगेनच्या ट्रेलर रिलीज संदर्भात एक प्रमोशनल व्हिडीओ शेअर केला आहे.  'सिंघम अगेन' सिनेमाचा ट्रेलर 7 ऑक्टोबर रोजी म्हणजेच उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'सिंघम अगेन'मध्ये अजय देवगण व्यतिरिक्त करीना कपूर, अर्जन कपूर, जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत. तर दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार यांचा कॅमिओ आहे. या सिनेमात अभिनेता अर्जुन कपूर खलनायकाच्या भूमिकेत आहे. 'सिंघम अगेन'ची हॉरर कॉमेडी भूल भुलैया 3' सोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.

टॅग्स :अजय देवगणरोहित शेट्टीबॉलिवूडसिनेमा