Deepika Padukone: 'ओम शांती ओम' या चित्रपटानंतर दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) करिअरला कलाटणी देणारा ठरला. हा सिनेमा त्यावेळी चांगलाच गाजला. चित्रपटात दीपिका आणि शाहरुखची (Shahrukh Khan) केमेस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. 'ओम शांती ओम'नंतर दीपिका-शाहरुखने बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. त्यातील एक म्हणजे 'चेन्नई एक्सप्रेस' हा चित्रपट. रोहित शेट्टी दिग्दर्शित या सिनेमामध्ये मुंबई ते रामेश्वरम प्रवासादरम्यान मजेशीर घटनांचा क्रम यामध्ये दाखवण्यात आला आहे. अभिनेता शाहरुख खानने चित्रपटात राहुल नावाचं पात्र साकारलं होतं. तर 'मिनम्मा' हे दीपिकाने साकारलेल्या पात्राचं नाव होतं. परंतु हा चित्रपट करताना दीपिका पादुकोणला काही सीन्स पुन्हा शूट करावे लागले होते. असं का करण्यात आलं? जाणून घ्या.
दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेला 'चेन्नई एक्सप्रेस' २०१३ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. हा चित्रपट त्यातील पात्र आणि एकुणच त्यांच्या अभिनयाने रंगलेली कथा प्रेक्षकांना भावली. त्यामध्ये दीपिकाचा दाक्षिणात्य अंदाज पाहायला मिळाला. चित्रपटात अभिनेत्रीला 'मिनम्मा'चं पात्र साकारण्यासाठी दीपिकाला खूप मेहनत घ्यावी लागली. त्यादरम्यान, 'चेन्नई एक्सप्रेस'मध्ये दीपिकाचा साऊथ अॅसेंटमध्ये बोलताना उच्चार फारसे स्पष्ट येत नव्हते. पण, जस जशी शूटिंगला सुरूवात झाली त्यानंतर तिच्या उच्चारांमध्ये बरीच सुधारणा झाली. शूटिंगदरम्यान तिचे उच्चार स्पष्ट येऊ लागले. याचा खुलासा रोहित शेट्टी यांनी एका मुलाखतीत केला होता.
जवळपास ४ दिवसांचं शूटिंग संपल्यानंतर रोहित शेट्टींनी शाहरुख खानने या विषयावर बातचीत केली. शाहरुखलाही त्यांचा मुद्दा पटला आणि त्यानंतर दीपिकाचे ते साऊथ अॅसेंटमध्ये बोलतानाचे सीन्स पुन्हा शूट केले गेले. सिनेमामध्ये मीनम्माची भूमिका मजेदार आणि वेगळी होती, दयाळू आणि धाडसी देखील होती. दीपिकाने ही भूमिका तिच्या खास शैलीत चोख बजावली. मीनम्माच्या भूमिकेत दीपिकाचा अभिनय, तिचे अनोखे साउथ इंडियन एक्सेंट, प्रसिद्ध संवाद आणि शाहरुख खानसोबतची तिची उत्कृष्ट केमिस्ट्री आजही प्रसिद्ध आहे.