Join us  

Rohit Shetty : बॉलिवुड संपले ? रोहित शेट्टीने रोखठोक उत्तर देत सर्वांची केली 'बोलती बंद'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 11:45 AM

बस काय यार इतके वर्ष आम्ही मनोरंजन केले एक वर्ष आमचं खराब काय झालं तुम्ही आमची साथच सोडली.

Rohit Shetty :  सध्या बॉलिवुड फारच कठीण परिस्थितीतून जात आहे. दाक्षिणात्य चित्रपट जगभरात कमाई करत आहेत. कांतारा (Kantara), आरआरआर (RRR), पुष्पा (Pushpa) या सिनेमांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलंय. या सगळ्यात बॉलिवुड संपलं का असा प्रश्न सगळ्यांना पडलाय. या प्रश्नाचे रोखठोक उत्तर रोहित शेट्टीने लल्लनटॉपच्या मुलाखतीत दिले आहे. बॉलिवुडची जादू कमी झाली असे म्हणणाऱ्या पत्रकाराला रोहित शेट्टीने थेट उत्तर दिले आहे. त्याचे उत्तर ऐकून अभिनेता रणवीर सिंग, वरुण शर्मा आणि उपस्थित सर्वच प्रेक्षक अवाक झाले. 

काय म्हणाला रोहित शेट्टी ?

दाक्षिणात्य सिनेमांची वाढती लोकप्रियता बघता बॉलिवुडची जादू कमी झाली का असे विचारले असता रोहित म्हणाला, 'ती जादू अनेक चित्रपटांत आहे. दोन वर्ष आपण कोरोनासारख्या संकटांचा सामना केला. अनेक मोठ्या सिनेमांचे शूटच सुरु झाले नाही किंवा काही चित्रपट रिलीज होऊ शकले नाहीत. जे रिलीज झाले ते सगळे आधीच तयार झाले होते. मात्र वर्षाच्या सुरुवातीला भूलभूलैय्या (Bhulbhulaiya) चालला, काश्मीर फाईल्स (Kashmir Files) चांगला चालला, आता दृश्यम (Drishyam) चालतोय तर असं नाहीए की आपले पिक्चर चालत नाहीत. 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) तुफान चालला. तुम्ही ६ दाक्षिणात्य चित्रपटांची नावं घेतली मी सुद्धा ६ बॉलिवुड सिनेमांची नावं घेतली.आपण एका संकटातून जातोय, जे मोठे बजेट सिनेमे बनवतात सर्वांनीच कोरोनाचा सामना केलाय. 

रोहित पुढे म्हणतो,'राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांचा सिनेमा आलेला नाही, भन्साळी (Sanjay Leela Bhansali) सर रणवीरसोबत एक मोठा सिनेमा करण्याच्या तयारित आहेत, रोहित शेट्टीने कॉमेडी बनवला आता सिंघम बनवेल, पठाण येतोय, फायटर, टायगर ३ येतोय. बस काय यार इतके वर्ष आम्ही मनोरंजन केले एक वर्ष आमचं खराब काय झालं तुम्ही आमची साथच सोडली. पलटी मारताय आता तुम्ही. शोले, मदर इंडिया,मुघले आजम, हम आपके है कौन, कुछ कुछ होता है, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, मैने प्यार किया सारखे सिनेमे आम्हीच बनवलेत. वाईट नका वाटून घेऊ पण जेव्हा जहाजात छेद होते तेव्हा उंदिरच सर्वात आधी पळ काढतात. पण आम्हीही टायटॅनिकला बुडू देणार नाही कारण त्याला उडवायचं कसं हे आम्हाला माहित आहे. कोरोनोमध्ये ५० टक्के लोकांनाच थिएटरमध्ये परवानगी होती लोक मास्क लावून जात होते तेव्हा सूर्यवंशीने १९६ कोटींची कमाई केली. आज त्याचे कॅल्युलेशन केले तर ती कमाई ३५० कोटी आहे.

मन भँवर उठे...जब आवे 'लेडी सिंघम'! दीपिका पादुकोण बनणार पोलीस, रोहित शेट्टीचं 'सरप्राइज'

बॉलिवुडवर बोट ठेवणाऱ्यांना रोहित शेट्टीने अगदी कडक भाषेत उत्तर दिले आहे. त्याचे उत्तर ऐकून प्रेक्षकांमध्ये अक्षरश: टाळ्यांचा कडकडाट झाला, शिट्ट्या वाजल्या. रणवीर सिंग तर हे पाहून अवाक झाला. रोहितचा आगामी 'सर्कस' हा सिनेमा येतोय. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान रोहितने हे थेट उत्तर देत उपस्थितांचे मन जिंकले.

टॅग्स :रोहित शेट्टीरणवीर सिंगबॉलिवूडहिंदीसिनेमा