Join us  

Rohit Shetty: लवकरच सुरु होणार अजय देवगणच्या 'सिंघम 3'चं शूटिंग, रोहित शेट्टीच्या सिनेमाबाबत आली नवी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 4:01 PM

या चित्रपटात करिना कपूर देखील दिसणार आहे. आता या चित्रपटाबाबत नवीन माहिती समोर आली आहे.

रोहित शेट्टी त्याच्या आगामी 'सिंघम अगेन' चित्रपटासाठी चर्चेत आहे, जो 'सिंघम' फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. या चित्रपटातून अजय देवगण आणि रोहित शेट्टी पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटात करिना कपूर देखील दिसणार आहे. आता या चित्रपटाबाबत नवीन माहिती समोर आली आहे. अलीकडेच एका मीडिया मुलाखतीदरम्यान रोहित शेट्टीने सांगितले की, 'सिंघम अगेन'चे काम येत्या दोन-तीन महिन्यांत सुरू होईल.

रोहित शेट्टी म्हणाला, 'सिंघम अगेन सुरू होण्यासाठी अजून काही वेळ बाकी आहे. सध्या आम्ही 'भारतीय पोलीस दला'वर काम करत आहोत. ते पूर्ण झाल्यावर आम्ही पुन्हा सिंघमवर काम सुरू करू. आता सुरू होण्यासाठी दोन-तीन महिन्यांचा अवधी आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, अजय देवगण आणि विकी कौशल देखील पाहुण्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

रोहित शेट्टीला या चित्रपटाबद्दल अधिक माहिती विचारण्यात आली तेव्हा तो म्हणाला, 'मी हा चित्रपट बनवण्यासाठी खूप उत्सुक आहे आणि याचे कारण म्हणजे या चित्रपटात तुम्हाला यावेळी पूर्णपणे वेगळा सिंघम पाहायला मिळणार आहे. स्क्रिप्टचे काम पूर्ण झाले आहे. ते पूर्णपणे वेगळं. 'सिंघम अगेन'मधून मी आणि अजय पुन्हा एकत्र काम करत असल्यामुळे मी खूप उत्साहित आहे.

पहिला चित्रपट 'सिंघम' (2011), त्यानंतर 'सिंघम रिटर्न्स' (2014). त्याचबरोबर 'सिम्बा' आणि 'सूर्यवंशी' हे देखील रोहितच्या कॉप युनिव्हर्सचे चित्रपट आहेत. सध्या रोहित शेट्टी खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करताना दिसतो आहे. 

टॅग्स :रोहित शेट्टीअजय देवगण