Join us

'सिंघम अगेन'आधी रोहित शेट्टी रिलीज करणार 'सिंघम', या तारखेपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 14:01 IST

'सिंघम अगेन' या बहुचर्चित सिनेमाआधी रोहित शेट्टी पहिला भाग अर्थात 'सिंघम' रिलीज करणार आहे (singham, ajay devgn)

दिवाळीत बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर होणार आहे ती म्हणजे 'सिंघम अगेन' आणि 'भूल भूलैय्या ३' या सिनेमाची. या दोन्ही सिनेमांच्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये चांगला माहोल केलाय. यापैकी जास्त चर्चा आहे ती म्हणजे 'सिंघम अगेन'ची. 'सिंघम अगेन'मध्ये बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार कॅमिओ करताना दिसणार आहेत. 'सिंघम अगेन'च्या धर्तीवर रोहित शेट्टी या सिनेमाचा पहिला भाग अर्थात 'सिंघम' सिनेमा पुन्हा रिलीज करणार आहे.

या तारखेला रिलीज होणार 'सिंघम'

रोहित शेट्टींनी घोषणा केलीय की 'सिंघम'चा पहिला भाग पुन्हा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'सिंघम अगेन'च्या पार्श्वभूमीवर दिवाळीला 'सिंघम' हा गाजलेला सिनेमा रिलीज होतोय. 'सिंघम अगेन'च्या पार्श्वभूमीवर 'सिंघम' सिनेमा दिवाळीच्या मुहुर्तावर १८ ऑक्टोबरला पुन्हा रिलीज करण्यात येतोय. 'सिंघम'मध्ये अजय देवगण, काजल अग्रवाल, प्रकाश राज, अशोक समर्थ हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. 'सिंघम अगेन'च्या आधी 'सिंघम'ला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं औत्सुकतेचा विषय आहे.

 

सिंघम अगेनची चर्चा जोरात

अजय देवगणच्या 'सिंघम' या फ्रेंचाइजी सिनेमाचा पहिला आणि दुसरा भाग प्रेक्षकांना खूप आवडला. आता या सिनेमाचा तिसरा भाग 'सिंघम अगेन' चर्चेत आहे. अजय देवगणचा हा सिनेमा दिवाळीत थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. १ नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होत असून 'भूल भूलैय्या ३' सोबत या सिनेमाची टक्कर होणार आहे. त्यामुळे 'सिंघम अगेन' की भूल भूलैय्या ३ कोणता चित्रपट बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

टॅग्स :अजय देवगणरोहित शेट्टीकरिना कपूरदीपिका पादुकोण