Join us

सारा अली खानचे रोहित शेट्टीला वाटते कौतुक, म्हणाला नवाबची मुलगी असूनही कामासाठी पसरले होेते माझ्यापुढे हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 19:13 IST

आजही असे कलाकारा आहेत ज्यांना कोणत्याही प्रकारचे बॅकग्राऊंड नसून स्वतःला सिद्ध केले आहे. आजही अनेकांच्या वाट्याला स्ट्रगल हे संपलेले नाही.

हिंदी चित्रपटसृष्टीत काही कलाकारांकडे एकाहून एक बड्या बॅनर्सचे सिनेमा असतात. या कलाकारांकडे दिग्दर्शकांची रांग लागलेली असते. तर काही कलाकारांचा संघर्ष काही संपता संपत नाही. कामासाठी स्ट्रगल करावा लागणारे अनेक कलाकार पाहायला मिळतील. मात्र असेही काही कलाकार आहेत ज्यांना केवळ घराणेशाहीमुळे  सहजच सिनेमात काम करण्याची संधी मिळते. 

छोटे नवाब सैफ अली खान आणि ज्येष्ठ अभिनेत्री अमृता सिंह यांची लेक सारा अली खानने काम मिळवण्यासाठी रोहित शेट्टीला फोन वर मेेसेज केला होता. सर मुझे काम दे दो मेसेज वाचल्यावर रोहित शेट्टीने तिला भेटण्यासाठी बोलवले होते.रोहित शेट्टीला पाहून अक्षरक्षः त्याच्या समोर हात जोडून काम देण्याची विनंती केली होती. नवाबची मुलगी असूनही आपल्यापुढे कामासाठी हात पसरत असल्याचे पाहून त्यानेही कसलाही विचार न करता सिंम्बा सिनेमासाठी तिला कास्ट करायचे ठरवले होते. मुळात इतका मठा सिनेमात सारा अली खान घेणे हे खूप मोठे आव्हान असल्याचे रोहितने म्हटले होते. सारा भूमिकेला योग्य न्याय देऊ शकेल की नाही याची त्याला धास्ती होती. 

अखेर सारानेही मिळालेल्या संधीचे सोनं केलं माझा विश्वास सार्थ ठरवला त्यामुळे साराचे करावे तितके कौतुम कमीच असेही त्याने म्हटले होते. अभिनेत्री बनण्यापर्यंतचा तिचा प्रवास इतका सोपा नसल्याचेही त्याने म्हटले आहे. मुळात साराला रोहित शेट्टीने संधी देण्यापूर्वीच केदारनाथ मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. साराही स्टारकिड असून तिने अशा प्रकारे स्ट्रगल करत काम मिळवल्याचे तिने कपिल शर्माशोमध्ये सांगितले होते.

आजही असे कलाकारा आहेत ज्यांना कोणत्याही प्रकारचे बॅकग्राऊंड नसून स्वतःला सिद्ध केले आहे. आजही अनेकांच्या वाट्याला स्ट्रगल हे संपलेले नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून स्टारकिडसना बड्या बॅनरचे सिनेमा मिळतात त्यामुळे खरे टॅलेंट आऊटसाईडर म्हणून त्याला दुर्लक्ष केेले जाते. 

 

टॅग्स :रोहित शेट्टीसारा अली खान