Join us  

'सिंघम अगेन'चं शूट पूर्ण, रोहित शेट्टीने शेअर केला अजय देवगणसोबतचा Video; चाहते भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 4:01 PM

रोहित शेट्टीने अजय देवगणसोबतच्या मैत्रीचा एक भावूक व्हिडिओ शेअर केला आहे.

रोहित शेट्टी (Rohit Shetty) आणि अजय देवगण (Ajay Devgn) या जोडीने हिंदी सिनेमाच्या इतिहासात अनेक सुपरहिट सिनेमे दिले. 'सिंघम', 'गोलमाल' या फ्रँचायझीला तर तोडच नाहीए. नुकतंच या दोघांनी 'सिंघम अगेन' चं शूटिंग संपवलं. रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील सिंघम, सूर्यवंशी आणि सिंबा तिघंही या सिनेमात एकत्र येत आहेत. दरम्यान रोहित शेट्टीने अजय देवगणसोबतच्या मैत्रीचा एक भावूक व्हिडिओ शेअर केला आहे.

"आज 'सिंघम' सिनेमाला १३ वर्ष पूर्ण झाली आहेत. नशीबाची जादू पाहा,आज सिंघम अगेनचंही शूट संपलं. अजयसोबतचा हा माझा दिग्दर्शक म्हणून १३ वा सिनेमा आहे. पण हा प्रवास ९० च्या दशकापासूनच सुरु झाला होता. तेव्हा मी अजयच्या मार्गदर्शनाखाली काम करत होतो. आज ३३ वर्षांनंतर आम्ही ताकदीने पुढे जात आहोत."

रोहित शेट्टीने या व्हिडिओला 'शोले' सिनेमाचं थीम म्युझिक लावलं आहे. तसंच 90S मधल्या अजयसोबतच्या व्हिडिओची झलकही दाखवली आहे.'13 वर्ष सिंघमची, ३३ वर्ष मैत्रीची' असं कॅप्शन त्याने व्हिडिओला दिलं आहे. 

रोहित शेट्टीच्या या पोस्टवर अजय देवगणने मजेशीर कमेंट करत लिहिले, 'आता माझी सटकलीचे १३ वर्ष आणि आता आपली सटकली चे ३३ वर्ष'. रोहितचा हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते भावूक झाले आहेत. 'सोशल मीडियावरचा बेस्ट व्हिडिओ' असं कॅप्शन त्याने दिलं आहे. 

टॅग्स :रोहित शेट्टीअजय देवगणबॉलिवूडसोशल मीडिया