या टेनिस स्टारच्या आयुष्यावर रोहित शेट्टीला बनवायचायं चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 04:36 AM2018-01-18T04:36:54+5:302018-01-18T10:08:10+5:30
सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड आहे. अनेक खेळाडूंच्या आयुष्यावर आतापर्यंत चित्रपट तयार करण्यात आले आहे. हे चित्रपट प्रेक्षकांच्यादेखील पसंतीस उतरले ...
स ्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड आहे. अनेक खेळाडूंच्या आयुष्यावर आतापर्यंत चित्रपट तयार करण्यात आले आहे. हे चित्रपट प्रेक्षकांच्यादेखील पसंतीस उतरले होते. मिळालेल्या माहितीनुसार दिग्दर्शक रोहित शेट्टी आणखीन एका खेळाडूच्या आयुष्यावर चित्रपट तयार करण्याचा विचार करतो आहे. नुकताच दिलेल्या एक मुलाखतीत रोहित म्हणाला होता की, बायोपिक बनवणे तेवढे सोप नसते यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. रोहित शेट्टी कॉमेडी आणि जबरदस्त अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखला जातो. मात्र यावेळी रोहित शेट्टीने टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
याआधी करण जोहरने देखील सानियाच्या आयुष्यावर चित्रपट तयार करण्याची इच्छा व्यक्त केली होती. एकदा इंटरव्ह्रु सानिया मिर्झाला प्रश्न विचारण्यात आला होता की तुझा आयुष्यावर चित्रपट तयार करण्यात आला तर त्यात कोणती अभिनेत्री असावी. यावर सानियाने परिणीती चोप्राचे नाव घेतले होते. रोहित शेट्टीचा गोलमाल अगने बॉक्स ऑफिसवर हिट गेला होता. त्यानंतर तो ‘सिम्बा’ हा चित्रपट रणवीर सिंगला घेऊन तयार करणार आहे. सध्या रोहित शेट्टी आणि करण जोहर दोघे इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स या रिअॅलिटी शोचे जज आहेत. शोबद्दल रोहित शेट्टी सांगतो, “माझ्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टी म्हणजे फक्त एकच गोष्ट एन्टरटेनमेंट. जर एक फिल्म मेकर म्हणून मी ते करू शकलो तर मी माझे काम केले आहे. पण जेव्हा तुम्ही कॅमेऱ्यासमोर असता तेव्हा गोष्ट वेगळी असते. अशा अनेक अभिनेत्यांची उदाहरणे आहेत ज्यांनी त्यांच्या मेहनतीने, टॅलेंटने सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे आणि अनेक दशके उलटून गेल्यानंतरही प्रेक्षकांच्या मनामध्ये ते घर करून आहेत. इतक्या वर्षांनी देखील त्यांची लोकप्रियता कशी काय कायम आहे याची व्याख्या कोणीच करू शकणार नाही. एक चांगला अभिनेता नेहमीच लक्षात राहतो आणि देशातील रसिकही त्याच्यावर प्रेम करतात. त्यामुळे स्टार इंडिया आमच्यासोबत इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्सचा शोध घेणार आहेत.”