‘या’ मालिकांमधील भूमिका रिमा लागूंनी केल्या अजरामर!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2017 10:31 AM2017-05-18T10:31:10+5:302017-05-18T16:01:10+5:30

अभिनयाच्या माध्यमातून हिंदी, मराठी सिनेसृष्टी त्याचबरोबर रंगभूमीवर आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या  ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे गुरुवारी ह्रदयविकाराच्या ...

Role of the 'Rama' actors! | ‘या’ मालिकांमधील भूमिका रिमा लागूंनी केल्या अजरामर!

‘या’ मालिकांमधील भूमिका रिमा लागूंनी केल्या अजरामर!

googlenewsNext
िनयाच्या माध्यमातून हिंदी, मराठी सिनेसृष्टी त्याचबरोबर रंगभूमीवर आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या  ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे गुरुवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीला धक्का बसला आहे. त्यांनी आपल्या कसदार अभिनयाच्या माध्यमातून अनेक व्यक्तिरेखा जिवंत केल्या होत्या. आईकडूनच त्यांना अभिनयाचे बाळकडू मिळाले होते. मोठा पडदा असो की रंगभूमी अत्यंत सहजपणे त्या आपली भूमिका साकारायच्या. अनेक हिंदी चित्रपटांमधून त्यांनी साकारलेली ‘आई’ आजही सिनेप्रेमींच्या अगदी लख्खपणे लक्षात आहे. त्यांनी काही मालिकांमध्येही भूमिका केल्या. ज्या काही मोजक्या भूमिकांमुळे त्या मालिका आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत.

खानदान
रिमा लागू यांनी त्यांच्या करिअरचा डेब्यू छोट्या पडद्यापासून केला. दूरदर्शनवरील ‘खानदान’ ही मालिका १९८५ मध्ये सुरू झाली. ही मालिका बरीच गाजली. त्यांच्यासोबत नीना गुप्ता, जयंत कृपलानी आणि गिरीष कर्नाड हे कलाकार देखील होते.

                                     

श्रीमान श्रीमती
१९९४ मध्ये  दूरदर्शनवर ‘श्रीमान श्रीमती’ ही मालिका सुरू झाली. यात रिमा लागू या कोकिला कुलकर्णी म्हणजेच कोकीच्या भूमिकेत दिसल्या. ती एक गृहिणी असते. त्यांच्यासोबत राकेश बेदी, अर्चना पुरणसिंग आणि जतिन कानकिया हे देखील होते.

                                      

तु तु मैं मैं 
हीच ती मालिका आहे ज्यातील त्यांची भूमिका सातत्याने आठवणीत राहते. ही एक कॉमेडी मालिका होती. यात त्यांनी देवकी वर्मा नावाची भूमिका केली आहे. राधा वर्मा या त्यांच्या सुनेच्या चुका शोधण्यात, भांडणात देवकीची व्यक्तीरेखा रमलेली असायची. सासू-सून यांची नोकझोक पडद्यावर पाहायला प्रचंड आवडली.

                                   

धडकन 
 डॉ.प्राजक्ता मराठे यांची भूमिका रिमा लागू यांनी ‘धडकन’ या मालिकेत साकारली. एका अमेरिकन नाटकावर आधारित असलेल्या या मालिकेत त्यांच्यासोबत किश्वर मर्चंट, राम कपूर आणि गौतमी कपूर हे होते.

                                  

नामकरण
 ही मालिका रिमा लागू यांची सर्वांत शेवटची मालिका ठरली. महेश भट्ट यांच्या या मालिकेत त्यांनी दयावंती मेहता यांच्या आजीची भूमिका साकारली आहे. या मालिकेच्या सेटवर ती बुधवारी रात्री ७ वाजेपर्यंत होत्या. घरी गेल्यानंतर त्यांच्या छातीत दुखु लागल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 


   

Web Title: Role of the 'Rama' actors!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.