शूटींग सुरु असताना कोसळले छत; थोडक्यात बचावला शाहरूख खान!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2017 05:32 AM2017-05-31T05:32:11+5:302017-05-31T11:02:11+5:30
शाहरूख खान एका अपघातातून सुदैवाने बचावला. सध्या शाहरूख आनंद एल राय यांच्या एका चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण चित्रपटाचे शूटींग जोरात सुरु आहे. या चित्रपटाच्या सेटवरच अपघात झाला आणि शाहरूख थोडक्यात बचावला.
श हरूख खान एका अपघातातून सुदैवाने बचावला. सध्या शाहरूख आनंद एल राय यांच्या एका चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण चित्रपटाचे शूटींग जोरात सुरु आहे. या चित्रपटाच्या सेटवरच अपघात झाला आणि शाहरूख थोडक्यात बचावला. शूटींग सुरु असतानाच या चित्रपटाच्या सेटचे एक छत अचानक कोसळले. यानंतर सेटवर एकच गोंधळ उडाला. रविवारी शाहरूख या चित्रपटाच्या शूटींगवर पोहोचला होता. मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये चित्रपटाचा सेट लागला आहे. शूटींगमध्ये अख्खे युनिक व्यस्त असताना अचानक छताचा एक भाग कोसळला. काय होतय, हेही कुणाला कळले नाही.
या अपघातात युनिटचे दोन सदस्य जखमी झालेत. या जखमींना त्वरित रूग्णालयात दाखल करण्यात आले. इजा किरकोळ असल्याने त्यांना लगेच रूग्णालयातून सुटी देण्यात आली. अपघात झाला तेव्हा शाहरूख छताच्या दुसºया भागाला होता. त्यामुळे तो सुदैवानेच बचावला, असेच म्हणता येईल. तूर्तास चित्रपटाचे शूटींग दोन दिवस थांबवण्यात आले आहे. शाहरूख खानच्या चित्रपटाच्या सेटवरचा हा पहिला अपघात नाही आहे. १९९३ मध्ये ‘डर’ या चित्रपटाच्या सेटवर शाहरूखच्या टाचेला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटाच्या शूटींगदरम्यानही मोठा अपघात झाला होता. यावेळी शाहरूखचा खांदा आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती.
शाहरूख खान व आनंद एल राय प्रथमच एकत्र काम करत आहे. या चित्रपटात शाहरूखसोबत अनुष्का शर्मा व कॅटरिना कैफ अशा दोघी दिसणार आहेत. म्हणजेच ‘जब तक हैं जान’नंतर ही तिकडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. आनंद एल राय यांनी यापूर्वी ‘रांझणा’ व ‘तनु वेड्स मनु’ यासारखे हिट चित्रपट दिले आहेत.