सैफ अली खान आणि करिना कपूर यांनी काही वर्षांपूर्वी गाजतवाजत लग्न केले. सैफचे हे दुसरे लग्न असून त्याचे पहिले लग्न अभिनेत्री अमृता सिंगसोबत झाले होते. अमृता आणि सैफ यांच्यात अमृता ही वयाने मोठी आहे. एका चित्रपटाच्या सेटवर त्या दोघांची ओळख झाली होती. पहिल्याच भेटीत ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. या भेटीनंतर सैफने काही दिवसांपूर्वी फोन केला आणि अमृताला डिनरला जाण्याविषयी विचारले. त्यावेळी अमृताने सैफला घरीच जेवायला बोलावले. त्या डिनरनंतर अमृता आणि सैफच्या गप्पा इतक्या रंगल्या की, तो दोन दिवस घरी गेलाच नाही. त्यानंतर काहीच वर्षांत त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
टशन सिनेमाच्या शूटिंगदरम्यान करिना आणि सैफ एकमेकांच्या जवळ आले होते. याबाबत करिनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, ''प्रेम व्यक्त करण्यासाठी सैफ कधीही स्वतःहून पुढाकार घेणार नाही, हे मला माहिती होते. म्हणून माझ्या परिने मी सर्व ते प्रयत्न केले. जेव्हा माझे प्रेम मी व्यक्त केले त्यावेळी करिना कपूर मला प्रपोज करतेय यावर माझा विश्वासच बसत नाही, असे सैफने म्हटले होते.'' शूटिंगनिमित्त आम्ही पॅरिसमध्ये एकत्र होतो. त्यावेळेस सैफने लग्नासाठी प्रपोज केल्याचे करिनाने सांगितलं.