कंगना आपला आगामी सिनेमा मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसीसाठी प्रचंड मेहनत घेताना दिसतेय. यात कंगना राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका वास्तवादी दिसण्यासाठी कंगना अनेक प्रयत्न करतेय. मणिकर्णिकामधील कंगनाचा क्वीन लूक आऊट झाला आहे तसचे सिनेमाच्या टीझर लाँचची डेट पण रिलीज करण्यात आली आहे. कंगनाच्या नव्या लूकमध्ये ती लाल रंगच्या सारीमध्ये ट्रेडिशनल लूकमध्ये दिसतेय. कंगना पहिल्यांदाच योद्धाची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी कंगना तलवारबाजी आणि घोडेस्वारीचे प्रशिक्षण देखील घेतले. ऐवढेच नाही तर स्टंट करताना बॉडी डबलची देखील तिने मदत घेतली नाही. सगळे स्टंट तिने स्वत: केले आहेत.
2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी मणिकर्णिकाचा टीझर रिलीज करण्यात येणार आहे. क्रिश हे या चित्रपटाचे अधिकृत दिग्दर्शक आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाखाली चित्रपट पूर्ण झाल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटात काही पॅचवर्क व नवे सीन्स टाकण्याचा निर्णय घेतला. पण तोपर्यंत क्रिश आपल्या दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये बिझी झालेत. त्यांच्या अनुपस्थित चित्रपटाचे काम कोण पुढे नेणार हा प्रश्न असताना कंगनाने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली. त्यामुळे कंगना या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून क्रेडिट घेईल, असेही मानले गेले. मात्र कंगना स्वत:हून नकार दिला आहे. क्रिश यांच्यासोबत कंगनाचे नावही दिग्दर्शक म्हणून देण्याची आॅफर झी स्टुडिओने कंगनाला दिली.पण कंगनाने म्हणे, यास नकार दिला. चित्रपट पूर्ण करणे आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य होते. मला कुठलेही क्रेडिट नको, असे कंगनाने म्हणे स्पष्ट केले आहे.