एस राजामौली (S Rajamauli) यांचा महत्त्वाकांक्षी चित्रपट 'आरआरआर' (RRR) रिलीजसाठी सज्ज झाला आहे. त्याची सर्व चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अजय देवगण (Ajay Devgan) या चित्रपटात छोट्या भूमिकेत आहे, तर आलिया भट(Alia Bhatt)ची भूमिका देखील केवळ २० मिनिटांसाठी आहे. परंतु दोघांनीही त्यांच्या छोट्या भूमिकेसाठी चित्रपटाच्या निर्मात्यांकडून करोडो रुपये मानधन घेतले आहेत.
आरआरआरमध्ये अजय देवगण ज्युनियर एनटीआर आणि राम चरणच्या मेंटॉरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांचे व्यक्तिमत्व स्वातंत्र्य सैनिकाचे आहे. अजय देवगणने केवळ सात दिवसांच्या शूटिंगसाठी ३५ कोटी रुपये मानधन घेतले आहे.
तर या चित्रपटात आलिया भट सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. बातम्यांनुसार, चित्रपटातील तिचे पात्र केवळ २० मिनिटांचे आहे. आलियाने या चित्रपटासाठी ९ कोटी रुपये घेतले आहेत. आलियाने साकारलेले सीतेचे पात्र बाहेरून अतिशय नाजूक असले तरी आतून खूप मजबूत आहे.
प्रेक्षकही या मेगा बजेट चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट २५ मार्चला रिलीज होत आहे. आरआरआरमध्ये अजय देवगण आणि आलिया भट यांच्या भूमिका हिंदी भाषिक प्रेक्षकांना आकर्षित करतील. या चित्रपटातून आलिया दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात रामचरण तेजा, जूनियर एनटीआर यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट दोन महान भारतीय स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या कथेवर आधारीत आहे.