Join us

राम चरणची पत्नी उपासनाने पहिल्यांदा मीडियासमोर फ्लॉन्ट केला बेबी बम्प, चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय प्रेग्नेंसीचा ग्लो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 3:30 PM

राम चरणची पत्नी पाच महिन्यांची प्रग्नेंट आहे. आई होण्याचा आनंद उपासनाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतोय.

'RRR' चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता राम चरणची लोकप्रियता प्रचंड  वाढली आहे. अलीकडे, अभिनेत्याने 27 मार्च रोजी त्याचा वाढदिवस  कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसह साजरा केला. सोशल मीडियावर राम चरणच्या वाढदिवसाचे फोटो  चांगलेच व्हायरल झाले होते. आता पुन्हा एकदा राम चरण आणि त्याच्या पत्नीचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याची पत्नी उपासना बेबी बम्प फ्लॉंट करताना दिसत आहे.

राम चरणाच्या पत्नीने फ्लॉन्ट केला बेबी बम्पसाऊथचा स्टार राम चरण आपल्या पत्नीसोबत वाढदिवस साजरा केल्यानंतर स्पॉट झाला. काल रात्री राम चरण आणि उपासना एका कार्यक्रमात दिसले. मीडियासमोर पोझ देण्यासाठी दोघेही बाहेर आले होते. या फंक्शनमध्ये राम ब्लॅक आउटफिटमध्ये खूपच डॅशिंग दिसत होता. तर, त्याची पत्नी उपासना रॉयल ब्लू बॉडीकॉन ड्रेसमध्ये तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसली.

 राम चरणची पत्नी उपासना ही पाच महिन्यांची प्रग्नेंट असून या वर्षाच्या शेवटी ती आपल्या बाळाला जन्म देणार आहे. फोटोंमध्ये उपासनाच्या चेहऱ्यावर आलेल्या प्रग्नेंन्सीचा ग्लो  स्पष्टपणे दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राम चरण आणि उपासना दहा वर्षांनी आई-वडील होणार आहेत. हे जोडपे त्यांच्या पहिल्या बाळाच्या स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे.  

 १४ जुन २०१२ साली रामचरण आणि उपासना लग्नबंधनात अडकले. हैदराबाद येथे त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. अनेक राजकीय आणि साऊथ, बॉलिवुड कलाकारांनी लग्नात हजेरी लावली. लग्नाच्या १० वर्षांनंतर दोघांच्या आयुष्यात ही आनंदाची बातमी आली आहे. त्यामुळे हे वर्ष नक्कीच रामचरणसाठी खास असणार आहे.  

टॅग्स :राम चरण तेजाTollywoodसेलिब्रिटी