RRR Movie: एस.एस राजामौली यांच्या RRR चित्रपटाने फक्त भारतातील प्रेक्षकांवरच नाही, तर जगभरातील प्रेक्षकांवर भुरळ घातली. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील Naatu Naatu गाण्याला 'बेस्ट ओरिजिनल सॉन्ग' कॅटेगरीत ऑस्कर मिळाला आहे. ऑस्कर जिंकल्यानंतर हे गाणे खूप चर्चेत आले आहे. परदेशातही या गाण्याचा मोठा चाहता वर्ग आहे. अलीकडेच, न्यू जर्सीमधून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये चाहत्यांनी टेस्ला कारद्वारे लाइट शो करत गाण्याला ट्रिब्युट दिला.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. व्हिडीओ पाहून टेस्ला गाड्या नाटू-नाटू गाण्यावर नाचत असल्यासारखा भास होत आहे. नाटू-नाटू हे गाणं एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केले आहे, तर त्याचे बोल चंद्रबोस यांनी लिहिले आहेत. हे गाणे ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.
टेस्ला गाड्यांचा व्हिडिओ व्हायरलRRR च्या अधिकृत हँडलवरुन टेस्ला गाड्यांचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यावर लिहिले की, "@Teslalightshows New Jersey #Oscar Winning #NaatuNaatu बीट्सवर लाईट सिंक केल्याबद्दल धन्यवाद..." या व्हिडिओमध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या टेस्लाच्या शेकडो गाड्या गाण्याच्या बीट्सच्या बरोबरीने हेडलाइट्स ब्लिंक करताना दिसत आहे.
कोणत्या टेस्ला कारमध्ये हे वैशिष्ट्य आहे?टेस्लाच्या कार 'टेस्ला टॉयबॉक्स' नावाच्या फीचरद्वारे लाइट शो करू शकतात. टेस्ला कार लाइट शो मोडसह अनेक मजेदार वैशिष्ट्ये ऑफर करतात. हे वैशिष्ट्य कारच्या हेडलाइट्स, टेललाइट्स, टर्न सिग्नल्स आणि आतील लाइट्स फ्लॅश करण्यासाठी आणि गाण्यासह रंग बदलण्यासाठी प्रोग्राम केले जाऊ शकतात. हे वैशिष्ट्य फक्त टेस्ला मॉडेल एस, मॉडेल एक्स आणि मॉडेल 3 मध्ये उपलब्ध आहे.