RRR Box Office Collection : बाप रे बाप...! ‘आरआरआर’ची छप्परफाड कमाई; 10 दिवसांत कमावले इतके कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 02:06 PM2022-04-04T14:06:15+5:302022-04-04T14:07:10+5:30
RRR Movie WW Box Office Collection Day 10: रिलीजच्या 9 व्या दिवशी RRR या चित्रपटानं 800 कोटींचा आकडा पार केला होता. आता रविवारच्या कमाईचे ताजे आकडेही समोर आले आहेत.
RRR Movie WW Box Office Collection Day 10: ‘आरआरआर’ (RRR) या राजमौलींच्या सिनेमानं कालचा रविवारही गाजवला. होय, काल 10 व्या दिवशीही या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत, सर्वांना थक्क केलं. भारतासह जगभरात या चित्रपटाने कोटींचा गल्ला जमवला.
रिलीजच्या 9 व्या दिवशी या चित्रपटानं 800 कोटींचा आकडा पार केला होता. आता रविवारच्या कमाईचे ताजे आकडेही समोर आले आहेत. त्यानुसार, काल रविवारी 10 दिवशी ‘आरआरआर’ने वर्ल्डवाईड 82.40 कोटींची कमाई केली. याचसोबत चित्रपटाच्या एकूण कमाईचा आकडा 901.46 कोटींवर पोहोचला.
#RRRMovie WW Box Office
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) April 4, 2022
Reaches a new milestone of MAMMOTH ₹900 cr.
Week 1 - ₹ 709.36 cr
Week 2
Day 1 - ₹ 41.53 cr
Day 2 - ₹ 68.17 cr
Day 3 - ₹ 82.40 cr
Total - ₹ 901.46 cr
Share alone crossed historical ₹500 cr mark in just 10 days.
टॉप 5मध्ये
‘आरआरआर’ने पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आता हा सिनेमा भारतातील सर्वाधिक कमाई करणाºया चित्रपटांच्या यादीत टॉप 5 मध्ये पोहोचला आहे. आधी ‘आरआरआर’ या यादीत 7 व्या स्थानावर होता. पण आता तो 5 व्या क्रमांकावर आला आहे. आमिर खानच्या ‘पीके’ला (832 कोटी)मागे टाकत ‘आरआरआर’ने (901.46 कोटी) या यादीत 5 वा क्रमांक पटकावला आहे.
Top 10 highest grossing Indian movies#Dangal#Baahubali2#BajrangiBhaijaan#SecretSuperstar#RRRMovie#PK#2Point0#Baahubali#Sultan#Sanju
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) April 4, 2022
हिंदी व्हर्जनही सुपर सॉलिड
‘आरआरआर’च्या हिंदी व्हर्जननेही धमाकेदार कमाई केली. दुस-या आठवड्यात शुक्रवारी या चित्रपटने 13.5 कोटींचा बिझनेस केला. शनिवारी 18 कोटींचा गल्ला जमवला तर रविवारी 20.50 कोटींची कमाई केली. याचसोबत‘आरआरआर’च्या हिंदी व्हर्जनची एकूण कमाई 184.59 कोटींवर पोहोचली. लवकरच हा सिनेमा 200 कोटी क्लबमध्ये सामील होईल, असा विश्वास जाणकारांनी व्यक्त केला आहे. असं झाल्यास हा रामचरण व ज्युनिअर एनटीआर यांचा 200 कोटी क्लबमध्ये सामील होणारा पहिला हिंदी सिनेमा असेल.