Join us  

RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 12:17 PM

Ramayana Movie : दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा बहुचर्चित 'रामायण' या चित्रपटाने कदाचित रिलीजपूर्वीच एक नवा विक्रम रचला आहे. यामध्ये रणबीर कपूर राम आणि साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.

दिग्दर्शक नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांचा बहुचर्चित 'रामायण' (Ramayana Movie) या चित्रपटाने कदाचित रिलीजपूर्वीच एक नवा विक्रम रचला आहे. यामध्ये रणबीर कपूर (Ranbir Kapoor) राम आणि साई पल्लवी (Sai Pallavi) सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. पण त्याआधीच हा चित्रपट भारतात बनलेल्या सर्वात महागड्या चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. पहिल्यांदाच या पौराणिक चित्रपट 'रामायण: पार्ट वन'चे बजेट १०० दशलक्ष अमेरिकन डॉलर म्हणजेच ८३५ कोटी रुपये असेल. या प्रकल्पाशी संबंधित एका सूत्रानेच ही माहिती दिली आहे.

'बॉलिवूड हंगामा'शी बोलताना, एका सूत्राने खुलासा केला की निर्माते चित्रपटाला जागतिक हिट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असेल. त्याचे बजेट ८३५ कोटी रुपये असेल. सूत्राने पोर्टलला सांगितले की, नमित मल्होत्रा ​​या चित्रपटात १०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे आणि हे फक्त भाग-१ साठी आहे. उर्वरित दोन भागांसाठी आणखी मोठी रक्कम खर्च केली जाईल.

भारतातील सर्वात महागडा चित्रपट 'रामायण'रणबीर कपूरचा २०२२चा ब्लॉकबस्टर चित्रपट 'ब्रह्मास्त्र पार्ट १'चे बजेट ४५० कोटी होते आणि आता तो नितेश तिवारीच्या चित्रपटात रामच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्याचे बजेट १०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स असेल. याआधी, 'कल्की २८९८ एडी', 'आदिपुरुष', २.० आणि 'आरआरआर' हे शेवटचे सर्वात जास्त बजेट असलेले चित्रपट होते, ज्यांचे बजेट ५०० ते ६०० कोटी रुपयांच्या पुढे गेले होते. मात्र रामायणने त्यांचा विक्रम मोडला आहे. रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनला ६०० दिवस लागतील. गेल्या महिन्यात या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते. हा चित्रपट २०२६ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :रणबीर कपूरसाई पल्लवी