सर्वाधिक पाहिलेला भारतीय चित्रपट कोणता आहे? असा प्रश्न केला तर त्याचे उत्तर 'बाहुबली', 'दंगल', 'पठाण', 'आरआरआर' 'जवान' किंवा 'केजीएफ' असे असेल. पण हे योग्य उत्तर नाही. जरी या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाल केली असली, तरीही यातील एकही चित्रपट हा सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट नाही. सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट हा चित्रपट सलमान, आमिर आणि शाहरुख या तीन सुपरस्टारचा नसून मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा आहे.
हा ब्लॉकबस्टर चित्रपट म्हणजे 'शोले'. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने खळबळ उडवून दिली होती. अमिताभ बच्चन यांच्या 1975 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची 25 कोटी तिकिटे विकली गेली. 'शोले' हा भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे.
IMDB च्या अंदाजानुसार 'शोले' हा चित्रपट रिलीज झाल्यापासून मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी पाहिला आहे. अनेक दशकांनंतरही, जेव्हा हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला, तेव्हा तो एकट्या भारतात 15 ते 18 कोटी प्रेक्षकांनी पाहिला. परदेशातही हा चित्रपट यशस्वी झाला आहे. या चित्रपटाला भारताबाहेर रशियात सर्वाधिक प्रेक्षक मिळाले. जवळपास ६ कोटी तिकिटांची विक्री तिथे झाली होती. तर उर्वरित जगातील सुमारे 2 कोटी लोकांनी हा चित्रपट पाहिला. अशाप्रकारे 'शोले' हा चित्रपट जगभरातील 22 ते 26 कोटी प्रेक्षकांनी पाहिला आहे.
शोलेहा अनेक प्रेक्षकांचा ऑलटाइम फेवरेट चित्रपट आहे. या चित्रपटातील प्रत्येक गाणे आणि ॲक्शन सीन्सने प्रेक्षकांची मनं जिंकली. 'कितने आदमी थे?' ते 'बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना' , 'पचास पचास कोस जब बच्चा रोता है तब उसकी मां उसे ’'बेटा चुप हो जा नही तो गब्बर आ जायेगा’ या शोले चित्रपटामधील डायलॉग्सला प्रेक्षकांची विशेष लोकप्रियता मिळाली. रमेश सिप्पी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. शोले हा चित्रपट बॉलिवूडमधील एक आयकॉनिक चित्रपट म्हणून ओळखला जातो.