बॉलिवूड अभिनेता संजय दत्त सध्या कॅन्सरशी झुंज देतोय. काही दिवसांपूर्वी संजयला फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले. त्याचा कॅन्सर चौथ्या स्टेजवर आहे. संजू लवकरच उपचारासाठी परदेशात जाण्याची शक्यता आहे. यामुळे संजयचे अनेक आगामी प्रोजेक्ट रखडणार आहेत. एक दोन नव्हे तर सहा प्रोजेक्ट त्याच्या हातात होते आणि या प्रोजेक्टवर तब्बल 735 कोटी रूपये लागले आहेत.येत्या काही दिवसांत संजयचा ‘सडक 2’ हा सिनेमा रिलीज होतोय. ओटीटीवर रिलीज होणा-या या सिनेमाचे शूटींग पूर्ण झालेय. मात्र डबिंगचे काम राहिले होते. संजयने नुकतेच हे काम संपवले. हा सिनेमा रिलीजसाठी तयार आहे. मात्र त्याच्या काही आगामी सिनेमांचे शूटींग मात्र अद्यापही बाकी आहे.
‘केजीएफ 2’ या सिनेमात संजय दिसणार आहे. साऊथच्या सुपरडुपर हिट सिनेमाच्या या सीक्वलमध्ये संजय निगेटीव्ह रोलमध्ये आहे. चित्रपटाच्या काही भागांचे शूटींग बाकी असल्याचे कळतेय.
‘तोरबाज’ या सिनेमात अफगाणिस्तानची कथा पाहायला मिळणार आहे. गिरीश मलिक दिग्दर्शित या सिनेमात संजू आर्मी आॅफिसरची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमात संजयसोबत नरगिस फाखरी आणि राहुल देव मुख्य भूमिकेत आहेत. ‘भुज : द प्राइड आॅफ इंडिया’ या अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. पण संजय दत्तची सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
‘शमशेरा’ या यशराज बॅनरच्या सिनेमात संजू रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. हा सिनेमाची घोषणा झालीय. काही भागांचे शूटींग झालेय. पण बरेच शूटींग बाकी आहे.याशिवाय ‘पृथ्वीराज’ या सिनेमातही संजय प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे बरेच शूटिंग बाकी आहे.एकंदर काय तर या सर्व सिनेमांवर 700 कोटींपेक्षा अधिक पैसा लागला आहे. संजयच्या आजारापणामुळे यापैकी काही सिनेमे कसे पूर्ण होतील, हे कळायला मार्ग नाही.