तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा संदर्भ जोडत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यकर्ता विवेक चंपानेरकर यांनी ठाणे कोर्टात जावेद अख्तर यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यामुळे येत्या १२ नोव्हेंबरपर्यंत अख्तर यांना उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
तालिबानमध्ये झालेल्या सत्तांतरानंतर संपूर्ण जगभरामधून प्रतिक्रिया उमटत होत्या. यामध्येच जावेद अख्तर यांनी दिलेल्या एका मुलाखतीत आरएसएचा उल्लेख केला होता. यामध्येच त्यांनी तालिबानची तुलना आरएसएससोबत केली होती. "तालीबानी आणि आरएसएस एकसमान आहेत अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे अॅड. धृतिमन जोशी कुर्ला न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली आहे.याच धर्तीवर आता ठाणे मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टातदेखील नवा दावा दाखल करण्यात आला आहे. आरएसएस कार्यकर्ता विवेक चंपानेरकर यांनी ठाणे कोर्टात जावेद अख्तर यांच्याकडून एक रूपया मानहानी वसूल करण्याची मागणी केली आहे.
"संघाची विचारसरणी तालिबानीसारखी आहे. आरएसएस लोकांची दिशाभूल करते.लोकांचं मानसिक खच्चीकरण करते", असं अख्तर यांनी त्यांच्या दाव्यात म्हटलं होतं. जावेद अख्तर यांच्या या वक्तव्यामुळे संघाची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप दाखल करण्यात आलेल्या याचिकांमध्ये करण्यात आला आहे.
"सावळ्या रंगामुळे मला रिजेक्ट केलं"; हिना खानला करावा लागला वर्णभेदाचा सामना
दरम्यान, या प्रकरणी जावेद अख्तर यांना अॅड. संतोष दुबे यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यामुळे तालिबानी आणि आरएसएसची तुलना केल्यामुळे अख्तरांच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
काय आहे अॅड. धृतिमन जोशी यांची तक्रार?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केलेल्या प्रकरणी जावेद अख्तर यांच्याविरोधात रा. स्व. संघाचे कार्यकर्ते अॅड. धृतिमन जोशी यांनी कुर्ला न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली आहे. त्याचप्रमाणे अब्रू नुकसानीचा १०० कोटी रूपयांचा दावा करणारी नोटीस धृतिमन जोशी यांनी पाठविली नसून ही केवळ अफवा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. हिंदू समाज किंवा संघाविषयी तथ्य आधारित माहिती न घेता खोडसाळपणे, मानहानीकारक, आक्षेपार्ह बतावणी करणाऱ्या तथाकथित लोकांना फक्त त्यांच्या चुकीची शिक्षा व्हावी, याकरिताच आपण जावेद अख्तर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असल्याचं जोशी यांनी सांगितलं आहे.