Join us  

रूबी रोझला करायचेय बॉलीवूडमध्ये काम ?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2016 5:17 AM

दीपिका पदुकोन ही सध्या तिचा आगामी हॉलीवूड डेब्यू ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ  एक्झांडर केज’ चित्रपटासाठी शूटिंग करत ...

दीपिका पदुकोन ही सध्या तिचा आगामी हॉलीवूड डेब्यू ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ  एक्झांडर केज’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. टोरँटोत ती ट्रिपल एक्स साठी शूटिंग करत होती. तिच्या को- स्टार्ससोबत तिने खुप फन टाईम घालवला.‘पिकू ’ अभिनेत्री सेटवरील फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. तिची धम्माल आणि मजा मस्ती ती फॅन्ससोबत शेअर करत होती. तिची को-स्टार रूब रोझ ही डिप्पीच्या सौंदर्याने आणि अभिनयाने खुप प्रभावित झाली आहे.तिने टिवटरवर पोस्ट केले आहे की,‘ हँगिंग आऊट विथ दीपिका पदुकोन हॅज मेड मी रिअली वॉन्ट टू डू अ बॉलीवूड फिल्म.’ अ‍ॅक्शन थ्रिलर ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ हा डी.जे.करूसो यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे.यात दीपिका आणि रूबीलासह विन डिजेल, निना डोबरेव्ह, सॅम्युअल एल.जॅक्सन हे असणार आहेत. चित्रपट २० जानेवारी रोजी रिलीज होणार आहे.