Join us

निर्मात्याने चित्रपटात काम देण्यासाठी या अभिनेत्रीकडे केली होती शरीरसंबंधाची मागणी, तिनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2019 1:32 PM

एका अभिनेत्रीने इंडस्ट्रीत तिला आलेल्या एका वाईट अनुभवाविषयी सांगितले आहे.

ठळक मुद्देपायलने या मुलाखतीत सांगितले आहे की, एका चित्रपटाच्या निर्मात्याने चित्रपटात काम करण्यासाठी मला शरीरसंबंध ठेवायला सांगितले होते. हे सगळे ऐकून मला धक्का बसला होता

फिल्मी जगतात प्रवेश करताना अथवा चित्रपटात काम करत असताना अनेक अभिनेत्रींना अतिशय वाईट परिस्थितींचा सामना करावा लागतो. मीटू चळवळीच्या माध्यमातून अनेक अभिनेत्रींनी याविषयी आवाज उठवला होता. आता अभिनेत्री पायल राजपूतने इंडस्ट्रीत तिला आलेल्या एका वाईट अनुभवाविषयी सांगितले आहे.

पायलने आयएक्स १०० या चित्रपटात काम केले होते. तिचा हा चित्रपट चांगलाच गाजला होता. पायलने आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. पायलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला आलेल्या कास्टिंग काऊचच्या एका अतिशय वाईट अनुभवाविषयी सांगितले आहे. पायलने या मुलाखतीत सांगितले आहे की, एका चित्रपटाच्या निर्मात्याने चित्रपटात काम करण्यासाठी मला शरीरसंबंध ठेवायला सांगितले होते. हे सगळे ऐकून मला धक्का बसला होता आणि मी यावर लगेचच विरोध केला होता. मला या निर्मात्याने चित्रपटाची कथा ऐकवण्यासाठी बोलावले होते. ही कथा ऐकवत असतानाच माझ्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली होती. त्यावेळी त्याला मी चांगलेच सुनावले होते. नी नेहमीच अतिशय इमानदारीने माझे काम करते. याआधी देखील मला अशा काही अनुभवांना तोंड द्यावे लागले होते. मीटू चळवळीनंतर अनेकजण समोर येऊन या विषयावर बोलत आहेत ही गोष्ट खूपच चांगली आहे. पण महिलांचे लैंगिक शोषण होणे हे केवळ चित्रपटसृष्टीत घडते असे नाही... तर सगळ्याच क्षेत्रात ही गोष्ट होत असते. काही मुली या विरोधात आवाज उठवतात. तर काहींना यावर आवाज उठवता येत नाही. मी या विरोधात आवाज उठवला तर मला चित्रपटात काम मिळणार नाही. पण चित्रपटात भूमिका मिळण्यासाठी मी कोणतेही कॉम्प्रोमाईज करणार नाही. 

पायलचे अनेक चित्रपट हिट झाले असून ती आता वेंकटेश आणि नागा चैतन्य यांच्या वेंकी मामा या चित्रपटात लवकरच झळकणार आहे. तसेच रवी तेजाच्या डिस्को राजा या चित्रपटात देखील ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

टॅग्स :Tollywood