RRR Pre-Release Business: ‘बाहुबली-1’नंतर एस. एस. राजमौलींचा ‘बाहुबली- 2’ हा सिनेमा आला आणि अभूतपूर्व गाजला. सिनेमानं अनेक रेकॉर्ड मोडीत काढले. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांने केलेली कमाई पाहून सगळेच थक्क झालेत. आज (25 मार्च) राजमौलींचा ‘आरआरआर’ (RRR ) हा नवा सिनेमा प्रदर्शित झाला. रिलीजनंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो, त्याचे आकडे समोर येतीलच. पण त्याआधीचा एक आकडा वाचून तुमचेही डोळे पांढरे होतील. होय, रिलीजआधीच राजमौलींच्या ‘आरआरआर’ या चित्रपटानं तब्बल 750 कोटी कमावले आहेत.‘आरआरआर’च्या निर्मात्यांनी 22 मार्चपासून प्री बुकिंगची सुरूवात केली. प्री- बुकिंग आणि राइट्सच्या माध्यामातून या चित्रपटानं रिलीज होण्यापूर्वीच 750 कोटींची कमाई केली. रिपोर्टनुसार, या चित्रपटाचा सर्व भाषांमधील प्री-रिलीज बिजनेस हा 520 कोटी आहे. पॅन इंडियानं या चित्रपटाचे उत्तर भारतातील डिस्ट्रिब्यूशन, डिजिटल आणि सॅटेलाइट राइट्स विकत घेतले आहेत.
मोडला ‘बाहुबली 2’ चा रेकॉर्डराजमौलींनी आपल्याच ‘बाहुबली 2’ या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडित काढला आहे. राजमौलींनी ‘आरआरआर’चे वितरण हक्क 470 कोटी रूपयांत विकल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. ‘बाहुबली 2’चे थियेट्रिकल राईट्स 350 कोटी रूपयाला विकले गेले होते.
रिलीजआधीच पैसा वसूलआरआरआर या चित्रपटाचा बजेट सुमारे 400 कोटी रूपये असल्याचं कळतं. अॅडव्हान्स बुकिंग व राईट्सच्या माध्यमातून 750 कोटी कमावून ही रक्कम ‘आरआरआर’ने रिलीजआधीच वसूल केली आहे. या चित्रपटात रामचरण, ज्युनिअर एनटीआर, आलिया भट, अजय देवगण अशी जबरदस्त स्टारकास्ट आहे.